कधी खाल्ली का तुम्ही रताळ्यांची पुरणपोळी? उपवासाला घरीच बनवा ही खास रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:16 IST2025-03-03T18:14:36+5:302025-03-03T18:16:26+5:30

Gondia : रताळ्यांमध्ये आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असल्याने आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ

Have you ever eaten sweet potato puran poli? Make this special recipe for fasting at home | कधी खाल्ली का तुम्ही रताळ्यांची पुरणपोळी? उपवासाला घरीच बनवा ही खास रेसिपी

Have you ever eaten sweet potato puran poli? Make this special recipe for fasting at home

गोंदिया : उपवास म्हटला म्हणजे रताळ्यांना विशेष मागणी असते. रताळ्यांमध्ये आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असल्याने व ते नैसर्गिक कंद असल्याने आवडीचे त्याचे सेवन केले जाते. या रताळ्यांपासून विविध प्रकारचे व्यंजन सुद्धा बनविले जातात. त्यात रताळ्यांची पुरणपोळी ही अतिशय आवडीने खाल्ली जाते.


कृती : सर्वप्रथम रताळ्यांना स्वच्छ धुवून कूकर किवा पातेल्यात उकडून घ्यावे. कंद उकडून झाल्यावर त्यावरील साल काढून मॅश करून त्यात वेलची पूड, एक चिमूट मीठ आणि पिठीसाखर मिक्स करून घ्यावे. तर पीठ भिजवून घेताना दोन वाटी पीठ व एक टेबल स्पून मैदा घ्यावा त्यात थोडे मीठ व दोन टेबल स्पून तेल घालून मऊसर भिजून गोळा तयार करून अर्धा तास झाकून ठेवावा. पिठाच्या साधारण लहान आकाराच्या गोळ्या घेऊन त्यामध्ये कंदाचे तयार केलेले सारण भरावे. हलक्या हाताने पोळीसारखं लाटून तव्यावर तूप घालून दोन्ही बाजूने शेकून घ्यावे. हा पदार्थ घरी सर्वांना आवडणारा आणि खायला आणि पचायला उत्तम आहे. सध्या बाजारात चांगल्या प्रकारचे कंद उपलब्ध आहेत. तेव्हा तुम्ही हा पदार्थ घरी नक्की करून बघा अगदी सोपा आणि चविष्ट आहे.


साहित्य
अर्धा किलो - रताळे,
एक पाव - पिठीसाखर,
अर्धा चमचा - वेलची पूड,
चवीनुसार मीठ,
साजूक तूप,
गव्हाची कणिक,
एक टेबलस्पून मैदा.

Web Title: Have you ever eaten sweet potato puran poli? Make this special recipe for fasting at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.