रानडुक राची शिकार करणारे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 09:54 PM2017-10-08T21:54:43+5:302017-10-08T21:54:54+5:30
गोठणगाव वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयांतर्गत गंधारी भाग-२ बीटमधील परिसरात रानडुकराची शिकार करून मांसाची परस्पर विल्हेवाट लावणाºया तिघांना वन विभागाच्या पथकाने शनिवारी (दि.७) मांसासह पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : गोठणगाव वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयांतर्गत गंधारी भाग-२ बीटमधील परिसरात रानडुकराची शिकार करून मांसाची परस्पर विल्हेवाट लावणाºया तिघांना वन विभागाच्या पथकाने शनिवारी (दि.७) मांसासह पकडले.
कार्यालयाचा अतिरीत्त कार्यभार सांभाळत असलेले वन क्षेत्राधिकारी सी.जी.रहांगडाले यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकासह गंधारी गाठून रानडुकराची शिकार करून मांस विक्री करीत असताना पांडूरंग श्रीराम मडावी (३९), लोमण बळीराम शहारे (३८) व संदीप हरिचंद डोंगरवार (२८) यांना रंगेहात पकडले. यातील पांडूरंग याने स्वत:च्या शेतात रानडुकराची शिकार केली होती.
तिघांच्या विरोधात भारतीय वन्यजीव अधिनीयम १९७२ च्या कलम २,९,३९,५०,५१ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक ठाकरे, बीट गार्ड हटवार, कापगते, राऊत, पाटील यांनी केली.