तेवीस वर्षांचा तरुण झाला चोपा ग्रामपंचायतीचा सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:26 AM2021-01-22T04:26:51+5:302021-01-22T04:26:51+5:30

: राजकारणात कोण कधी येईल, हे सांगता येत नाही. सर्वांच्या नशिबी राजकीय सुख नसते. पण, काहीजण नशीब घेऊनच अवतरतात. ...

He became a member of Chopa Gram Panchayat at the age of 23 | तेवीस वर्षांचा तरुण झाला चोपा ग्रामपंचायतीचा सदस्य

तेवीस वर्षांचा तरुण झाला चोपा ग्रामपंचायतीचा सदस्य

Next

: राजकारणात कोण कधी येईल, हे सांगता येत नाही. सर्वांच्या नशिबी राजकीय सुख नसते. पण, काहीजण नशीब घेऊनच अवतरतात. चोपा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तालुक्यातील सर्वात कमी वयाचा २३ वर्षीय तरुण शिक्षणाचे धडे घेत असताना वाॅर्ड क्रमांक ३ मधून निवडून आला.

बाबादास राजकुमार मेश्राम असे त्या सर्वात तरुण सदस्याचे नाव आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बाबादास भाजप समर्थीत पॅनलवर निवडणुकीत उभा होता आणि गड जिकंला. बाबादासला सहज घेणारे राजकारणीही तोंडात बोटे घालून बाबादासच्या विजयाची चर्चा करताना दिसतात. बाबादासचे वडील शेतकरी आहेत. निवडणूक जिंकली, आता पुढे काय करणार, या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतांना बाबादास लोककल्याणकारी कामे करणार असल्याचे सांगतो. भाजपचे पचायत समिती माजी सभापती डॉ. किशोर गौतम आणि भोजराज श्रीपात्रे यांचे आशीर्वाद मिळाल्याने या निवडणुकीत विजयी झाल्याचे बाबादास सांगायला विसरला नाही. बाबादास सध्या बी. ए.च्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे.

Web Title: He became a member of Chopa Gram Panchayat at the age of 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.