बीएसएनएल टॉवरमुळे परिसरात डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 09:52 PM2019-02-03T21:52:30+5:302019-02-03T21:52:53+5:30
ग्राम नवेझरी येथील बीएसएनएल सेवा ठप्प पडली असून मोबाईलमध्ये टॉवर राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी हैराण झाले आहेत. बीएसएनएलने त्वरित सेवा दुरुस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा, शेतकरी, शेतमजूर तथा तिरोडा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुलाबटोला : ग्राम नवेझरी येथील बीएसएनएल सेवा ठप्प पडली असून मोबाईलमध्ये टॉवर राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी हैराण झाले आहेत. बीएसएनएलने त्वरित सेवा दुरुस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा, शेतकरी, शेतमजूर तथा तिरोडा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.
ग्रामीण भागामध्ये शासनाच्या मोबाईल सेवेचा अधिक लाभ घ्यावा म्हणून भारत दूरसंचार निगमने शेतकऱ्यांसाठी अॅग्रीकल्चर प्लान काढून मोठ्या प्रमाणात शेतकºयांना इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देण्याचा गवगवा केला. परंतु पाहिजे त्या प्रमाणात सेवा मुळीच देत नाही. उलट भारत दूरसंचार सेवा ठप्प करुन खासगी मोबाईल कंपन्यांना मोबाईल रेंज पुरविण्याचा छुपा करार करुन ग्राहकांना हक्कापासून वंचित करण्याचे कारस्थान सुरु असल्याचे आरोप ग्राहक करीत आहेत. भारत दूरसंचार कंपनीने ग्रामीण भागात त्वरीत सेवा दुरुस्त करुन ग्राहकांची डोकेदुखी थांबवावी.
अन्यथा ग्राहक रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा शेतकरी-शेतमजूर संघटनेचे व सरपंच संघटनेचे महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे. यावर प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
सेवा नॉट रिचेबल
गावकरी संतप्त : वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : गेल्या २४ जानेवारीपासून वीज बिलाचा भरणा भारत संचार निगम लिमिटेडच्या येथील ग्राहक सेवा केंद्राने न केल्यामुळे व जनरेटरचा डिझेल कोटा संपल्यामुळे बीएसएनएलची टेलीफोन, मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली आहे. त्यामुळे मात्र ग्राहक, सरकारी कार्यालय व बँकाची फारच गैरसोय होत आहे.
गेल्या २४ जानेवारी रोजी विज बीलाचा भरणा न केल्यामुळे महावितरणने बीएसएनएलच्या येथील ग्राहक सेवा केंद्राचा वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे टेलीफोन (लॅन्डलाईन), मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली आहे. डीजीटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या शासनाच्या काळात वीज बिल भरण्यासाठी व जनरेटर चालविण्यासाठी निधी असू नये असा सवाल करुन रवी लंजे यांनी संताप व्यक्त केला आहे.
सेवा ठप्प झाल्याने परिसरातील टेलीफोन धारक, मोबाईल व इंटरनेट सेवा वापरणारे ग्राहक, बॅँका व सरकारी कार्यालयांना याचा जबरदस्त फटका बसला आहे. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देवून दुरसंचार सेवा त्वरित सुरु करण्याची मागणी नवेगावबांध ग्रामवासीयांनी केली आहे.