देशाच्या विकासासाठी आरोग्य सेवा महत्त्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 11:54 PM2018-02-12T23:54:04+5:302018-02-12T23:54:19+5:30

आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा आहे. यामुळेच आम्ही तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी सतत प्रयत्नरत असतो.

Health care is important for the development of the country | देशाच्या विकासासाठी आरोग्य सेवा महत्त्वपूर्ण

देशाच्या विकासासाठी आरोग्य सेवा महत्त्वपूर्ण

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : लहीटोला येथील आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा आहे. यामुळेच आम्ही तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी सतत प्रयत्नरत असतो. पुढेही क्षेत्रातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. कारण नागरिकांचे आरोग्य उत्तम राहिल्यास देशाची प्रगती होते. यामुळे प्रत्येकच देशाच्या प्रगतीसाठी आरोग्य सेवा महत्वपूर्ण असल्याचे प्र्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम लहीटोला येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांनी, आमदार अग्रवाल यांनी प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी प्रयत्न करून त्यात ते यशस्वीही ठरले आहेत. मात्र सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे, गोंदियात शासकीय मेडीकल कॉलेजची स्थापना केल्याचे या वेळी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, लता दोनोडे, कृषी सभापती शैलजा सोनवाने, चमन बिसेन, डुलेश्वरी लिल्हारे, भोजराज चुलपार, दिनेश तुरकर, विमल नागपूरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्र्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Web Title: Health care is important for the development of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.