आरोग्य सेवा प्रत्येकापर्यंत पोहचावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 01:10 AM2018-08-01T01:10:42+5:302018-08-01T01:12:08+5:30

जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील गोंदिया तालुक्याचा शासनाच्या हेल्थ वेलनेस योजनेत समावेश करण्यात आम्हाला यश आले आहे. यामुळे आता तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतमध्ये कार्यान्वीत सुमारे ५६ आरोग्य उपकेंद्रांत एक एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती केली जाईल.

Health care should reach everyone | आरोग्य सेवा प्रत्येकापर्यंत पोहचावी

आरोग्य सेवा प्रत्येकापर्यंत पोहचावी

googlenewsNext
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : दासगाव येथील आरोग्य शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील गोंदिया तालुक्याचा शासनाच्या हेल्थ वेलनेस योजनेत समावेश करण्यात आम्हाला यश आले आहे. यामुळे आता तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतमध्ये कार्यान्वीत सुमारे ५६ आरोग्य उपकेंद्रांत एक एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती केली जाईल. त्यामुळे आता दररोज २० परिवारांच्या घरी दौरा करून आरोग्य तपासणी करणे आवश्यक होणार आहे. कॉंग्रेस शासन काळात आम्ही तालुक्यातील प्रत्येकच गावात आरोग्य सेवा पोहचविण्याचे प्रयत्न केले. प्रत्येकापर्यंत आरोग्य सेवा पोहचावी हेच आमचे उद्दीष्ट असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम दासगाव येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून ईसीजी, ब्लडप्रेशर, शुगर, नेत्ररोग दंतरोग, चर्मरोग, गरोदर माता व कुपोषीत बालकांची तपासणी करण्यात आली. शिबिरात जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. वी.पी.रूखमोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रमोद खंडाते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चौरागडे, चमन बिसेन, प्रकाश रहमतकर, अर्जुन नागपुरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, लक्ष्मी रहांगडाले, स्नेहा गौतम, ओमप्रकाश भक्तवर्ती, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, प्रमिला करचाल यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.

Web Title: Health care should reach everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.