आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनाच उपचाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:36 AM2018-09-15T00:36:05+5:302018-09-15T00:37:43+5:30

तालुक्यातील ग्राम तिल्ली-मोहगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पंचायत समिती सभापती माधुरी टेंभरे यांनी शुक्र वारी (दि.७) आकस्मिक भेट दिली. यावेळी औषधी निर्माता एन. ए. जायस्वाल सतत अनेक महिन्यांपासून गैरहाजर असल्याचे हजेरीपत्रकावरु न दिसून आले.

Health care workers only need treatment | आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनाच उपचाराची गरज

आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनाच उपचाराची गरज

googlenewsNext
ठळक मुद्देनशेत होता आरोग्य सेवक : तिल्ही मोहगाव येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील ग्राम तिल्ली-मोहगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पंचायत समिती सभापती माधुरी टेंभरे यांनी शुक्र वारी (दि.७) आकस्मिक भेट दिली.
यावेळी औषधी निर्माता एन. ए. जायस्वाल सतत अनेक महिन्यांपासून गैरहाजर असल्याचे हजेरीपत्रकावरु न दिसून आले.
आरोग्य सेवक के. एल. पंबाला दारु च्या नशेत आढळले. तर एल.एच.व्ही. एम. जे. उके व परीचर डी. पी. मेश्राम यांनी सुट्टीचा अर्ज दिला नाही व हजेरी पत्रकात स्वाक्षरी केली नव्हती.
यामुळे या केंद्रातील कर्मचाऱ्यांवर येथील रु ग्णकल्याण समितीचे नियंत्रण नसून ही समिती फलकावर कार्य करीत असल्याची व रु ग्णांपेक्षा येथील कर्मचाऱ्यांचा उपचार करणे आवश्यक असून त्याशिवाय रु ग्णसेवा देता येणार नाही असी चर्चा गावकऱ्यांत आहे. येथील पंचायत समिती अंतर्गत ५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यात सोनी, तिल्ली-मोहगाव, चोपा, कवलेवाडा व कुºहाडी येथील प्राथमिक केंद्र येतात.
या आरोग्य केंद्रात कर्मचारी गैरहाजर असतात त्यामुळे रुग्णांना पाहिजे ती सेवा दिली जात नाही. या उलट पावसाळ््याच्या दिवसांत रूग्णांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे सभापती माधुरी टेंभरे यांनी तिल्ली-मोहगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी शुक्रवारी (दि.७) सायंकाळी ५.२५ वाजता या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवुन पाहणी केली.
यावेळी आरोग्य केंद्रात कर्मचारी हजर नव्हते. कर्मचारी निवासातून आरोग्य सेविका येताच इतर कर्मचाºयांना बोलावण्यात आले व हजेरीपत्रकाची पाहणी करु न हलचल नोंदवही पाहण्यात आली.
यात कर्मचारी गैरहजर दिसून आल्याने कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी, रुग्णकल्याण समितीचे पदाधिकारी यांची कार्यशैली सभापती टेंभरे यांना दिसुन आल्याने सतत गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सभापती टेंभरे यांनी केली आहे.

औषधी निर्माता जायस्वाल यांच्यावर १ ते ४ चे प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे आहे. गैरहजर कर्मचाऱ्यांची चौकशी करु न त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
-एम. बी. नंदागवळी
आरोग्य विस्तार अधिकारी
पंचायत समिती, गोरेगाव

Web Title: Health care workers only need treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.