आरोग्य केंद्र एका सेवकाच्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 09:23 PM2018-07-29T21:23:44+5:302018-07-29T21:24:56+5:30

लाखो रुपये खर्च करुन ग्राम भजेपार येथे आरोग्य उपकेंद्राची भव्य इमारत बांधण्यात आली. मात्र एकाच आरोग्य सेवकाच्या भरवशावर सदर उपकेंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्याने गावकऱ्यांना उपचाराकरिता इतर ठिकाणी जावे लागते.

Health Centers depend on a single serviceman | आरोग्य केंद्र एका सेवकाच्या भरवशावर

आरोग्य केंद्र एका सेवकाच्या भरवशावर

googlenewsNext
ठळक मुद्देभजेपार येथील उपकेंद्र : केंद्रात डॉक्टरांच्या नियुक्तीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : लाखो रुपये खर्च करुन ग्राम भजेपार येथे आरोग्य उपकेंद्राची भव्य इमारत बांधण्यात आली. मात्र एकाच आरोग्य सेवकाच्या भरवशावर सदर उपकेंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्याने गावकऱ्यांना उपचाराकरिता इतर ठिकाणी जावे लागते. त्यामुळे गावकºयांनी संताप व्यक्त केला आहे. जिल्हा आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष असून वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी भजेपार वासीयांनी केली आहे.
सालेकसा तालुक्यातील ग्राम भजेपार येथे ७० लाख रुपये खर्च करुन आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधण्यात आली. मात्र एकच आरोग्य सेवक नियुक्त करण्यात आला आहे. गाव मोठे असून लोकसंख्या चार हजारांच्या जवळपास आहे. मागील दोन वर्षांपूर्वी गावात मलेरियाने थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे गावाला पाण्याने वेढले होते. त्यामुळे गाव चिखलाने माखले होते व अशा परिस्थितीत विविध आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत भजेपार येथील उपकेंद्र येते. डॉक्टर नसल्याने रुग्णांना इतर ठिकाणी दूरवर जाऊन उपचार करावा लागतो. त्यामुळे आरोग्य केंद्राची इमारत शोभेची वस्तू बनली आहे. लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देत नाहीत. फक्त निवडणुकीपूरतेच लोकप्रतिनिधी येत असून त्यानंतर कानाडोळा करतात असे गावकरी बोलत आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने याकडे लक्ष घालून डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी सरपंच सखाराम राऊत व उपसरपंच कैलाश बहेकार यांनी निवेदनातून केली आहे.

Web Title: Health Centers depend on a single serviceman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.