१४९ बालकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:53 AM2021-02-18T04:53:56+5:302021-02-18T04:53:56+5:30
शिबिरात जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुप अग्रवाल, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुमित पीसे, नेत्रतज्ज्ञ डॉ. चंद्रकिशोर पारधी, डॉ. प्रवीण बाहेकर, डॉ. वैशाली ...
शिबिरात जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुप अग्रवाल, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुमित पीसे, नेत्रतज्ज्ञ डॉ. चंद्रकिशोर पारधी, डॉ. प्रवीण बाहेकर, डॉ. वैशाली मेश्राम, डॉ. यशस्वी चौरसिया यांनी बालकांचे वजन, उंची, हृदय, पोट व नेत्रविकार, कान, नाक, घसा यांचे आजार, दंत आजार, त्वचा रोग, जीवनसत्त्वाची कमतरता यावर १४९ बालकांची तपासणी केली. विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीसुद्धा वैद्यकीय शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात ज्येष्ठ डॉक्टरांनी रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिरात ईसीजी, रँडम ब्लड शुगर, रक्तदाब तपासणी, बॉडी मास इंडेक्स, डोळ्यांची तपासणी निशुल्क उपलब्ध करून देण्यात आली.
शिबिरासाठी समन्वयक श्रद्धा टेंभरे, शाळेच्या मुख्याध्यापिका लीनता लोखंडे, अरुण चन्ने, जयश्री उईके, लक्ष्मी पिंगरे, पल्लवी मोटघरे, लता चव्हाण, प्रशांत जांभुळकर यांनी सहकार्य केले.