‘जनजागरणा’त आरोग्य तपासणी
By Admin | Published: January 3, 2017 12:40 AM2017-01-03T00:40:51+5:302017-01-03T00:40:51+5:30
जिल्हा पोलीस प्रशासन प्रमुख पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरी
केशोरी पोलीस ठाणे : मोफत औषधोपचार व विविध योजनांची माहिती
गोंदिया : जिल्हा पोलीस प्रशासन प्रमुख पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरी पोलीस ठाण्याद्वारे धमदीटोला येथील पटांगणावर जनजागरण मेळावा २०१६ पार पडला. याप्रसंगी विविध स्पर्धासुद्धा घेण्यात आल्या.
अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे होते. जनतेला शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शनासाठी अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, पोलीस निरीक्षक मंगेश चव्हाण, नायब तहसीलदार कोपुलवार, वासनिक, कृषी मंडळ अधिकारी रामटेके, सिधराम, सरपंच मनिषा साखरे, जिल्हा दक्षता समिती सदस्य हरीशचंद्र उईके, सत्य सामाजिक संस्थेचे देवेंद्र गणवीर व नागपूर येथील पथक तथा आशा हॉस्पीटल कामटी नागपूरचे संचालक डॉ. सौरभ अग्रवाल यांचे पथक उपस्थित होते. त्यांनी शासकीय योजनांवर मार्गदर्शन केले.
या वेळी धमदीटोला, ईळदा, परसटोला, अरततोंडी, जुनेवानी, राजोली, भरनोली परिसरातील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. ३० डिसेंबर रोजी जनजागरण मेळाव्यामध्ये परिसरातील मुलांच्या कबड्डी स्पर्धा, महिलांची संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कृषी विभाग, भारतीय स्टेट बँक, स्वयंम रोजगार केंद्र, नक्षल सेल गोंदिया यांचे स्टॉल लावून जनतेला मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य शिबिर अंतर्गत अतिदुर्गम भागातील लोकांना डॉ. सौरभ अग्रवाल यांच्या पथकद्वारे तसेच डॉ. कुकडे यांच्या फिरत्या पथकाने २०० ते ३०० लोकांची नि:शुल्क रक्त तपासणी केली. पोलीस विभागाकडून औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या उपस्थितीत जनतेला नक्षलविरोधी माहिती, त्यांचा सर्वांगिण विकास, स्त्रियांचे कायदे व हक्क आणि शासन राबवित असलेल्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सुमारे दोन ते अडीज हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता, त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संचालन अनिल लाडे यांनी केले. आभार पोउपनि गोपाल यांनी मानले. कार्यक्रमासाठी सपोनि कुंभरे, पोउपनि महादेव जठार, पोउपनि विशेंद्रसिंग व सर्व पोलीस कर्मचारी, धमदीटोला येथील ग्रामस्थ, पोलीस पाटील, सरपंच आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)