दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:42+5:302021-06-11T04:20:42+5:30

डासांच्या प्रादुर्भावाने गावकरी त्रस्त तिरोडा : डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने डासांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम ...

The health problem due to bad smell is serious | दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर

दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर

googlenewsNext

डासांच्या प्रादुर्भावाने गावकरी त्रस्त

तिरोडा : डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने डासांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे डासांचे निर्मूलन करणे गरजेचे आहे.

प्रदूषण रोखण्यास मंडळाचे दुर्लक्ष

आमगाव : वाहनांना कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भररस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई होत नाही.

गौण खनिज चोरीकडे दुर्लक्ष!

सडक-अर्जुनी : महसूल आणि वनविभागाच्या हद्दीतील गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे; परंतु महसूल विभाग केवळ रेती तस्करांच्या मागावर असतात.

प्रसाधनगृहाअभावी व्यापाऱ्यांची कुचंबणा

गोंदिया : व्यापारी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या मोठ्या बाजारात प्रसाधनगृहाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे ग्राहक, व्यापाऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे.

लक्ष लागले आता नुकसान भरपाईकडे

केशोरी : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या परतीच्या पावसाने आणि तुडतुडा, करपा, खोडकिडा या कीडरोगांनी खरीप हंगामातील धानपिकाची नासाडी झाली. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतला. कृषी विभागाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले आणि मदत मिळण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले आहेत. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईकडे लागले आहे.

रोजगार सेवकांना अत्यल्प मानधन

गोरेगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झटणारे रोजगार सेवक संकटात आहेत. लोकांच्या हाताला काम द्यावे म्हणून मनरेगांतर्गत काम उपलब्ध करून देण्यात त्यांची जबाबदारी आहे. मनरेगा कामाची जबाबदारी पार पाडणाऱ्या रोजगार सेवकांनाच अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. रोजगार सेवकांच्या या मागणीकडे शासनाने लक्ष देऊन ही मागणी लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी रोजगार सेवक संघटनेने केली आहे.

घोगरा ते देव्हाडा रस्त्यांची दुरवस्था

मुंडीकोटा : जवळील ग्राम घोगरा ते देव्हाडा रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. हा रस्ता अपघाताला आमंत्रण ठरत आहे. घोगरा ते देव्हाडा या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. गिट्टी व मुरूम उखडून बाहेर रस्त्याच्या कडेला पडलेला आहे. हा रस्ता पूर्णपणे जीर्ण आहे.

अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची लागली वाट

रावणवाडी : गोंदिया तालुक्यातील बनाथर, कासा, तेढवा, जिरूटोला परिसरातील वाळूघाटांचा लिलाव सुरू झाला नाही, तरीही मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा सुरू आहे. वाळूचे ट्रॅक्टर रात्रंदिवस धावत असल्याने गावकुसातील रस्ते उखडले आहेत. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे. गोंदिया तालुक्यातील वाळूघाटांतून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूचे उत्खनन केले जात आहे. वाळू भरून जाणाऱ्या ट्रॅक्टरमुळे कासा, जिरुटोला, कोरणी, बनाथर, तेढवा रस्त्याची स्थिती खराब झाली आहे. विशेष म्हणजे, वाळूमाफियांना महसूल विभागाचे अधिकारी कारवाईसाठी येत असल्याची माहिती सुरुवातीलाच मिळत असते. ते आपल्या जवळची व्यक्ती रावणवाडीपासून घाटाकडे जाणाऱ्या मार्गावर तैनात करत असतात. ही व्यक्ती अधिकारी, कर्मचारी येत असल्याची सूचना माफियांना देत असतात. कधी काळी सेटिंग करून कर्मचाऱ्यांना मोकळे करत असतात. परिणामी, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. प्रशासकीय अडचणीमुळे वाळूघाटांचा लिलाव झाला नसल्याचे बोलले जाते. वाळूमाफिया गावातील कच्चे रस्ते आणि पांगडी रस्त्यावरून वाळूची वाहतूक करत असल्याने रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वाळूमाफियांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.

निराधारांना मानधनाची प्रतीक्षा

गोरेगाव : कोरोना संसर्गाच्या काळात निराधारांना मानधनाची प्रतीक्षा कायम आहे. गत काही महिन्यांपासून निराधारांना मानधन मिळाले नाही. अनेकांची आज उपासमार होत आहे. बँकेत चौकशी करावी, तर कोरोनामुळे बाहेर निघणेही कठीण आहे, अशा स्थितीत निराधार जीवन जगत आहे.

तिरोड्यात जनावरांचे रस्त्यांवर अतिक्रमण

तिरोडा : तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये रस्त्यावर गावांतील नागरिक जनावरे बांधतात. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास होत आहे. नगरपंचायतीने या प्रकाराकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज असताना दुर्लक्ष होत आहे.

प्रखर दिव्यांमुळे अपघाताची शक्यता

देवरी : दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पुढे हेडलाइट लावले जातात. मात्र, काही तरुण साधे दिवे न लावता, निळ्या रंगाचे, तसेच प्रखर दिवे लावत असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा तरुणांवर कारवाई करून अपघाताला आळा घालावा.

Web Title: The health problem due to bad smell is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.