बदलत्या वातावरणात नवतपा तापवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:27 AM2021-05-16T04:27:57+5:302021-05-16T04:27:57+5:30

गोंदिया : वर्षभरातील सर्वाधिक तापणारे ९ दिवस म्हणून नवतपा ओळखला जात असून नवतपा म्हणताच अंगाला घाम फुटतो. यंदा २५ ...

Heating in a changing environment | बदलत्या वातावरणात नवतपा तापवणार

बदलत्या वातावरणात नवतपा तापवणार

Next

गोंदिया : वर्षभरातील सर्वाधिक तापणारे ९ दिवस म्हणून नवतपा ओळखला जात असून नवतपा म्हणताच अंगाला घाम फुटतो. यंदा २५ मे पासून नवतपाला सुरुवात होत असून त्यापुढचे ९ दिवस किती तापणार याचा विचार करूनच धडकी भरत आहे. विशेष म्हणजे, सध्या ऊन व पावसाचा डाव सुरू असून अशा या बदलत्या वातावरणात नवतपात उन्हाची दाहकता अंगाला भाजून सोडते की पावसाच्या सरी भिजवून टाकतात हे बघायचे आहे.

उन्हाळा म्हटला की घामाच्या धारा सुटत असून धडकीच भरते. कडक उन्हात घराबाहेर पडणे जीवघेणेच ठरत असून कामकरी लोकांना मात्र कामासाठी बाहेर पडावेच लागते. त्यात उन्हाळ्याचे ४ महिने लवकरात लवकर संपावेत अशी कामना सर्व करतात. त्यातही मे महिन्यातील ऊन म्हणजे अंगाला भाजून सोडणारे असते. घराबाहेर पडताच अंगाची लाहीलाही करणारी उन्हे पडत असल्याने कधी-कधी आपले घर गाठावे अशीच सगळ्यांची इच्छा असते. मे महिन्यात सर्वाधिक ऊन तापत असून या महिन्याच्या शेवटीच नवतपा लागतो.

नवतपा म्हणजे ९ दिवसांचा काळ असून या ९ दिवसांत उन्हाळ्यातील सर्वाधिक ऊन तापते असे म्हटले जाते. म्हणजेच उन्हाळ्याच्या ४ महिन्यांतील उन्हाची कसर या ९ दिवसांत निघते असे बोलले जाते. म्हणूनच नवतपा म्हणताच अंगाला घाम फुटू लागतो. यंदा २५ मे पासून नवतपा लागणार असून त्यापुढचे ९ दिवस नवतपाचे राहणार आहेत. म्हणजेच, मे महिन्याचा शेवट जून महिन्यातील २ दिवस हा नवतपा घेणार आहे. मात्र, सध्या मागील पंधरवड्यापासून ऊन व पावसाचा खेळ सुरू असल्याने यंदाचा नवतपा असाच पावसात निघून जावा अशीच मागणी सर्वांची देवाकडे आहे.

--------------------------------

बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच वातावरणात बदल होत असून चांगलाच पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे पावसाचे हे काही दिवस दिलाशाचे गेले व मे महिन्याचा पंधरवडा कसा तरी निघून गेला. आता मात्र नवतपा येत असून हे ९ दिवस चांगलेच तापणारे राहत असल्याने लोकांना धडकी भरली आहे. चांगले ऊन तापत असताना सायंकाळी वादळ दाटून अचानकच पाऊस येत असल्याने वातावरण ढवळून गेले आहे. परिणामी याचा परिणामही आरोग्यावर जाणवत आहे.

Web Title: Heating in a changing environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.