जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:16 PM2018-08-27T22:16:17+5:302018-08-27T22:16:31+5:30
हवामान विभागाने सोमवार (दि.२७) व मंगळवारी जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर रविवारी (दि.२६) सायंकाळ पासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातील पुजारीटोला व धापेवाडा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हवामान विभागाने सोमवार (दि.२७) व मंगळवारी जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर रविवारी (दि.२६) सायंकाळ पासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातील पुजारीटोला व धापेवाडा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे.
मागील २४ तासात सरासरी १३ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सायंकाळपासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने सोमवारी (दि.२७) सकाळी पुजारीटोला प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले. तर धापेवाडा प्रकल्पाचे ५ दरवाजे उघडण्यात आले आहे.
दरम्यान हवामान विभागाच्या इशाºयानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदी काठालगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
दरम्यान पावसामुळे धानपिकांना सुध्दा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे.