गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी; एक मुलगा वाहून गेल्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 04:44 PM2019-09-02T16:44:12+5:302019-09-02T16:44:52+5:30
सडक अर्जुनी तालुक्यात सोमवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार वृष्टीने सर्वत्र पाणी साठले असून, यात एक मुलगा वाहून गेल्याची माहिती आहे.
Next
ठळक मुद्देडव्वा सर्कल परिसरात ढगफुटीसदृश परिस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया:
सोमवारी पहाटे ३ वाजल्यापासूनच या संपूर्ण परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली होती. सकाळी ७ वाजता पावसाचा जोर अधिकच वाढला. पावसाचा जोर बोथली, म्हसवाणी भागात सर्वात जास्त होता. येथील ग्रामपंचायत, अंगणवाडीसह नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने पडझडीचाही धोका वाढला आहे. त्याचबरोबर खाद्यपदार्थ, धनधान्याचेही मोठे नुकसान झाले आहे. म्हसवाणी या गावालगत वाहणाऱ्या नाल्यातून कार्तिक खोमेश्वर गौतम हा १९ वर्षांचा मुलगा वाहून गेल्याची गावात चर्चा आहे. शेतालाही मोठा तडाखा बसल्याने संपूर्ण पिके पाण्याखाली गेली आहेत.