गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी, देवरी, सालेकसा तालुक्यात पूर परिस्थिती
By अंकुश गुंडावार | Published: September 10, 2024 09:28 AM2024-09-10T09:28:51+5:302024-09-10T09:29:20+5:30
Heavy rains in Gondia district: जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दुसर्या दिवशी कायम असून जिल्ह्य़ात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे देवरी, सालेकसा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
गोंदिया : जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दुसर्या दिवशी कायम असून जिल्ह्य़ात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे देवरी, सालेकसा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया येथे पावसामुळे घर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पावसाचा जोर कायम असून जिल्ह्य़ातील पुजारीटोला, कालीसरार, शिरपूरबांध धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे नदी काठालगतच्या ९५ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर नदीनाल्यांना पूर आल्याने काही मार्ग बंद झाले आहेत.