कोरोना संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:36 AM2021-06-09T04:36:33+5:302021-06-09T04:36:33+5:30
गोंदिया : कोविड १९च्या महासंकटामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ६९३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे सातत्याने कोरोना संकटात सापडलेल्या ...
गोंदिया : कोविड १९च्या महासंकटामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ६९३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे सातत्याने कोरोना संकटात सापडलेल्या कुटुंबांना भेट देण्यात येत असून, त्यांचे मनोबल वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. यातील काही कुटुंबे ही अत्यंत अडचणीत आहेत. अशात अशा कुटुंबांना जमेल ती मदत करा, असे जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी कळविले आहे.
कित्येक घरातील कमावत्या पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शासनाच्या वतीने ज्या योजनांचा लाभ या कुटुंबांना देता येईल, त्याकरिता जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अशात जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, तसेच सामाजिक संघटनांनी संकटात सापडलेल्या या कुटुंबांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो, याचा विचार करून आपल्या स्तरावरून त्यांना जी मदत करता येईल, ती मदत करावी. किमान अशा कुटुंबांना भेट देऊन त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करावा, असे जिल्हाधिकारी खवले यांनी कळविले आहे.