स्पीड ब्रेकरच्या साहाय्याने वीज निर्मिती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 09:56 PM2017-12-06T21:56:39+5:302017-12-06T21:57:48+5:30

पाणी आणि कोळश्याचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे भविष्यात वीजेची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही समस्या ओळखत वीज निर्मितीसाठी पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

With the help of speed breaker, power generation can be possible | स्पीड ब्रेकरच्या साहाय्याने वीज निर्मिती शक्य

स्पीड ब्रेकरच्या साहाय्याने वीज निर्मिती शक्य

googlenewsNext
ठळक मुद्देगोंदियातील शिक्षकाचा प्रयोग : अपघात टाळण्यास होणार मदत

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : पाणी आणि कोळश्याचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे भविष्यात वीजेची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही समस्या ओळखत वीज निर्मितीसाठी पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोंदिया येथील एका शिक्षकांने चक्क हॉयवेवरील स्पीड ब्रेकरच्या सहाय्याने वीज निर्मिती करणे शक्य असल्याचा प्रयोग तयार केला आहे. सध्या हा प्रयोग जिल्हावासीयांसाठी चांगलाच कुतुहलाचा विषय ठरत आहे.
प्रतिक चिंतामन वालदे रा.गोंदिया असे त्या प्रयोगशिल शिक्षकाचे नाव आहे. वालदे हे गोंदिया मुर्री येथील चंद्रभागा हायस्कूलमध्ये शिक्षक पदावर कार्यरत आहे. मागील सहा सात वर्षांपासून इन्स्पायर अर्वाड विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन विविध शाळांमध्ये केले जात आहे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वालदे यांनी विज्ञान प्रदर्शनीकरिता एक अभिनव प्रयोग करण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी पत्नी स्वाती आणि त्यांच्या मित्रांची मदत घेत हॉयवेवरील मुव्हेबल स्पीड ब्रेकरच्या मदतीने वीज निर्मितीचा प्रयोग तयार केला. महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी आणि वाहनांच्या वेगाला मर्यादा लावण्याकरिता महामार्गावर स्पीड ब्रेककर तयार केले जातात. मात्र हे स्पीडब्रेकर जर मुव्हेबल असल्यास या स्पीड ब्रेकवरून वाहन गेल्यानंतर त्याच्या दाबापासून वीज निर्मिती करणे शक्य आहे. त्यांनी या प्रयोगाला ‘हॉयवे इलेक्ट्रीकसिटी जनरेटर’ असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे याच प्रयोगाच्या मदतीने पवन ऊर्जा निर्मिती देखील शक्य आहे. हॉयवेवरुन दररोज शेकडो वाहने धावतात. या वाहनाच्या गतीने निघाºया वाºयाव्दारे पवन ऊर्जा निर्माण करणे शक्य आहे. हे स्पीड ब्रेकर मुव्हेबल असल्याने अपघात टाळण्यास देखील त्याची मदत होणार असल्याचा दावा वालदे यांनी केला आहे. हा प्रयोग कोणत्याही महामार्गावर राबविता येणे शक्य आहे. यासाठी येणार खर्च देखील फार कमी असून यातून भविष्यातील विजेच्या समस्येवर मात करणे शक्य असल्याचे वालदे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
प्रयोगासाठी वापरलेले साहित्य
वालदे यांनी स्पीड ब्रेकरच्या मदतीने वीज निर्मितीचा प्रयोग सादर करण्यासाठी प्लॉयवूड, लाकडी बीट, सीडी लोडर, डिसी मीटर, प्लास्टीक पाईपचा तुकडा आदी साहित्याचा उपयोग केला.
अशी होईल वीज निर्मिती
हॉयवे वरुन दररोज शेकडो वाहने धावतात. या मार्गावर मुव्हेबल स्पीड ब्रेकर तयार करायचे, या स्पीड ब्रेकवरुन वाहन जाताच त्याच्या दाबामुळे त्याच्याखाली लावलेली मोटार तेवढ्याच वेगाने फिरले, त्याच्या घर्षणापासून निर्माण होणाऱ्या उर्जेचे वीजेत रुपांतर होईल. शिवाय स्पीड ब्रेकर मुव्हेबल असल्याने ब्रेक दाबल्यानंतर लागत असलेल्या इंधनाची बचत करणे सुध्दा शक्य होणार असल्याचा दावा वालदे यांनी केला आहे.
हे आहेत फायदे
विना इंधन विजेची निर्मिती, दचके मुक्त ब्रेकरमुळे अपघात टाळण्यास मदत, वाहनाच्या गतीने निघणाऱ्या वाऱ्याव्दारे पवन ऊर्जेची निर्मिती शक्य. विजेच्या समस्येवर मात करणे शक्य, कोणत्याही महामार्गावर लावणे शक्य आदी फायदे आहेत.

Web Title: With the help of speed breaker, power generation can be possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.