नाथजोगींच्या भविष्यासाठी मदत करणार

By admin | Published: February 19, 2016 02:08 AM2016-02-19T02:08:49+5:302016-02-19T02:08:49+5:30

अनेकांचे राशीभविष्य पाहून आपला उदरनिर्वाह करणारा नाथजोगी समाज आज अनेक सोयीसुविधा व योजनांपासून

Helping the future of the nostalgia | नाथजोगींच्या भविष्यासाठी मदत करणार

नाथजोगींच्या भविष्यासाठी मदत करणार

Next

गोंदिया : अनेकांचे राशीभविष्य पाहून आपला उदरनिर्वाह करणारा नाथजोगी समाज आज अनेक सोयीसुविधा व योजनांपासून वंचित आहे. या समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चित मदत करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. अदासी येथील आयुर्वेदिक शासकीय दवाखान्यात आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटक म्हणून डॉ. सूर्यवंशी बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीष क्ळमकर, अदासी सरपंच निर्मला बहेकार, माजी जिल्हा परिषद सदस्य जगदिश बहेकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, नाथजोगी समाजाच्या वस्तीसाठी कर्मचारी समन्वय समतिीने केलेले कार्य निश्चितच अभिमानास्पद आहे. या समाजासाठी जन्म दाखले तयार करण्यात आले. सध्या कापडी तंबूत या समाजातील कुटूंब मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. त्यांना कायमचे घरकूल देण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून येत्या ६ ते ८ महिन्यात घरकूल देण्याची कार्यवाही करण्यात येईल.
सर्व यंत्रणा या समाजाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, पशूधन विकास विभागाच्या वतीने त्यांना शेळ्या-मेंढ्याच्या गटाचा पुरवठा करण्यात येईल. महिलांना कुटीर उद्योग सुरु करण्यासाठी त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येईल. या समाजातील मुलांना स्वबळावर उभे करण्यासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गावडे म्हणाले, पूर्वी सामाजिक व्यवस्था प्रगत नव्हती आज ती प्रगत आहे. आजच्या प्रगतीपासून वंचित असलेल्या नाथजोगी समाजासाठी ग्रामपंचायतीने काही योजना राबविल्या आहे. भविष्यातही आणखी योजना ग्रामपंचायत राबविणार आहे. लोकांचे राशी भविष्य पाहून लोकांच्या आशा जागृत करण्याचे काम नाथजोगी समाजाने सुरु ठेवावे. तसेच प्रगतीच्या दृष्टीने प्रयत्न करावे असेही ते म्हणाले. सरपंच बहेकार म्हणाल्या, २००५ मध्ये हा समाज गावात आला. त्यांच्या अनेक समस्या ग्रामपंचायतीने सोडविल्या. आज त्यांना घरकुलाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी जि.प.सदस्य बहेकार म्हणाले, पूर्वी या गावचा सरपंच म्हणून या समाजाच्या समस्यांची सोडवणूक केली. गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. नाथजोगींच्या घरकुलांचा व रोजगाराचा प्रश्न जिल्हाधिकारी निश्चितपणे सोडवतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अधिकारी-कर्मचारी समन्वय समतिीचे संस्थापक समाजकल्याण विभागाच्या जातपडताळणी समतिीचे सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त अनिल देशमुख यांनी आपल्या मनोगतातून समतिीने नाथजोगी समाजाच्या कल्याणासाठी आजपर्यंत राबविलेल्या विविध उपक्र माची व समतिीने केलेल्या विविध समाजपयोगी कार्याची माहिती दिली.
प्रास्ताविकातून अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे सचिव दुलीचंद बुध्दे यांनी नाथजोगी समाजाच्या प्रगतीसाठी करण्यात आलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी आयोजित आरोग्य तपासणी शिबीरात अदासी येथील ग्रामस्थ तसेच नाथजोगी महिला भिगनी यांनी आपला सहभाग नोदंविला व आरोग्य तपासणी केली.
कार्यक्रमाला जीवन लंजे, लिलाधर पाथोडे, तहसिलदार संजय पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण, डॉ. रहांगडाले, भरणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष तांबू यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)
नाथजोगी वस्तीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
४अदासी येथे आरोग्य तपासणी शिबीराच्या उद्घाटनाला जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी आले असता त्यांनी नाथजोगी वस्तीला भेट देऊन पाहणी केली. नाथजोगी समाजातील नागरिक व महिलांशी चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी त्यांनी जाणून घेतल्या. महिलांनी काही कुटीर उद्योगाची निवड करावी, तसेच त्यासाठी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये. घर आण िपरिसरात स्वच्छता ठेवावी तसेच मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याचेही पालकांना सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते, वरिष्ठ शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र जैन, अनिल देशमुख, तहसिलदार संजय पवार, दुलीचंद बुध्दे, लिलाधर पाथोडे, जीवन लंजे यांची उपस्थिती होती.

Web Title: Helping the future of the nostalgia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.