निराधार बालकांना दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:36 AM2021-07-07T04:36:12+5:302021-07-07T04:36:12+5:30
अर्जुनी मोरगाव : येथील कोलते कुटुंबातील आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर निराधार झालेल्या निरागस बालकांच्या मदतीला दानशूर धावून येत आहेत. ...
अर्जुनी मोरगाव : येथील कोलते कुटुंबातील आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर निराधार झालेल्या निरागस बालकांच्या मदतीला दानशूर धावून येत आहेत. रविवारी दोघांनी कोलते कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
अर्जुनी मोरगाव येथे दुचाकी दुरुस्तीचे काम करून आपला उदरनिर्वाह चालविणारे रामदास कोलते यांचे कोरोनामुळे निधन झाले. पाच महिन्यांपूर्वी त्यांची पत्नीसुद्धा मरण पावल्याने त्यांच्या दोन मुली व अडीच वर्षाचा मुलगा निराधार झाले. रविवारी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्यामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान, साकोलीचे उपाध्यक्ष डॉ. गजानन डोंगरवार यांनी लोकमतमध्ये वृत्त वाचल्यानंतर त्यांनी सदर प्रतिनिधीशी संपर्क केला. या बालकांना मदत देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी त्या बालकांना पाच हजार रुपये रोख, मास्क, सॅनिटायजर या भेटवस्तू दिल्या. अनाथ व निराधार बालकांची मदत करण्याचे पुण्य लाभले. त्या बालकांना धीर देत स्वतःला निराधार समजू नका. संकटाला सामोरे जाताना अडचणी येतात. आपण शक्य ती मदत करू असे सांत्वन केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अरविंद शिवणकर, झरपडा येथील सरपंच कुंदा डोंगरवार, मीना शहारे, डाॅ. मनोज डोंगरवार, डाॅ. अनिल झोळे, अनाथ मुली व पालक उपस्थित होते, तर रविवारी सडक अर्जुनी येथील समाजशील शिक्षक अनिल मेश्राम यांनी कोलते यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू व रोख एक हजार रुपयांची भेट दिली.
050721\img-20210704-wa0018.jpg
निराधार बालकांना मदत देतांना डॉ गजानन डोंगरवार