गरजू कुटुंब व अनाथ मुलांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:38+5:302021-06-23T04:19:38+5:30

ग्राम फुटाळा येथील हेमराज ठाकरे यांचे मे महिन्यात कोरोनामुळ‌े निधन झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सुनीता ठाकरे, त्यांची एक ...

Helping needy families and orphans | गरजू कुटुंब व अनाथ मुलांना मदत

गरजू कुटुंब व अनाथ मुलांना मदत

googlenewsNext

ग्राम फुटाळा येथील हेमराज ठाकरे यांचे मे महिन्यात कोरोनामुळ‌े निधन झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सुनीता ठाकरे, त्यांची एक मुलगी आणि एक मुलगा अडचणीत आले. अशात मेश्राम यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना थोडी मदत म्हणून धान्य, किराणा सामान आणि रोख रक्कम भेट दिली. त्यांचे सांत्वन करून मुलांना शिक्षण सोडू नका, आम्ही सगळेसोबत आहोत, काही अडचण आली तर नक्की सांगा, असा धीर दिला. सहाय्यक शिक्षक एन. आर. गिरेपुंजे यांना भारताचा संविधान भेट दिला. जिल्ह्यातील ३२ अनाथ बालकांना सौंदड येथे घरी बोलावून धान्य, जीवनावश्यक वस्तू आणि नगदी भेट तथा थोर पुरुषांचे चरित्र पुस्तक भेट दिले. याप्रसंगी फुटाळा येथील सरपंच सुनीता गोबाडे, देवरीचे नायब तहसीलदार बी. टी. यावलकर आणि ग्रामपंचायत, फुटाळाचे रोजगार सेवक तेजराम मेश्राम उपस्थित होते.

Web Title: Helping needy families and orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.