अनैतिक संबंध लपविण्यासाठी नात्यातीलच मुलाला विष पाजले, एका महिलेसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 02:18 AM2017-08-20T02:18:24+5:302017-08-20T02:18:38+5:30

अनैतिक संबंध लपविण्यासाठी नात्यातीलच पंधरा वर्षीय मुलाची विष पाजून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार, गुरुवारी सालेकसा तालुक्यातील ग्राम सावंगी येथे उघड झाला.

To hide immoral relations, the child's son was poisoned, three women were arrested along with a woman | अनैतिक संबंध लपविण्यासाठी नात्यातीलच मुलाला विष पाजले, एका महिलेसह तिघांना अटक

अनैतिक संबंध लपविण्यासाठी नात्यातीलच मुलाला विष पाजले, एका महिलेसह तिघांना अटक

Next

गोंदिया : अनैतिक संबंध लपविण्यासाठी नात्यातीलच पंधरा वर्षीय मुलाची विष पाजून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार, गुरुवारी सालेकसा तालुक्यातील ग्राम सावंगी येथे उघड झाला. मृत मुलाच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून एका महिलेसह तिघांना अटक केली आहे.
विनय ललेश लिल्हारे (१५) असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. १४ आॅगस्टच्या रात्री सुनीता महेश लिल्हारे (३५) हिच्या घरी विनयच्या गाईचे वासरू शिरले होते. त्याला पकडण्यासाठी तो गेला असता, सुनीता व ब्रिजेश कवडू लिल्हारे या दोघांना त्याने नको त्या अवस्थेत पाहिले. त्यामुळे गावात आपली बदनामी होईल, या भीतीने कवडू सोनू दमाहे (३५) याच्या मदतीने सुनीता आणि ब्रिजेशने विनयला पकडून मारहाण केली व त्याला उंदीर मारण्याचे औषध पाजले.
विनयचा भाऊ अनिकेत (१४) याने हा सर्व प्रकार पाहिला. मात्र, त्यालाही या तिघांनी याची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तथापि, या घटनेची माहिती मिळाल्यावर, गावकºयांनी विनयला गोंदियाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला नागपूरला हलविण्यात आले. मात्र, गुरुवारी विनयचा मृत्यू झाला. अनिकेत याच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी खून व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून, सुनीता, ब्रिजेश व कवडू या तिघांना अटक केली आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत़ आरोपींनी वापरलेले उंदीर मारण्याचे औषध कोठून आणले़ त्यांना ते कोणी दिले, याचा तपास पोलीस करणार आहेत़

Web Title: To hide immoral relations, the child's son was poisoned, three women were arrested along with a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.