शिक्षणातूनच यशाची उंच भरारी

By admin | Published: July 14, 2017 01:18 AM2017-07-14T01:18:54+5:302017-07-14T01:18:54+5:30

शिक्षितक युवक-युवतींना रोजगार देण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार प्रधानमंत्री कौशल विकास कार्यक्रम राबवित आहे.

High feat of success through education | शिक्षणातूनच यशाची उंच भरारी

शिक्षणातूनच यशाची उंच भरारी

Next

विनोद अग्रवाल : वॉल पेंटिंग स्पर्धा उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शिक्षितक युवक-युवतींना रोजगार देण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार प्रधानमंत्री कौशल विकास कार्यक्रम राबवित आहे. या माध्यमातून शिक्षितांना प्रशिक्षीत करून रोजगाराच्या संधी दिल्या जात आहेत. यासाठी मात्र योग्य शिक्षणाची गरज आहे. कारण योग्य शिक्षणातूनच यशाची उंच भरारी भरता येत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.
नगरसेवक विवेक मिश्रा व प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयाच्या संयुक्तवतीने शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील टेक्नीकल परिसरात आयोजीत वॉल पेंटींग स्पर्धेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शहर अध्यक्ष सुनील केलनका, नगरसेवक विवेक मिश्रा, प्रोग्रेसिव्ह ग्रूप आॅप स्कूलचे संस्थापक डॉ. निरज कटकवार, दिनेश मिश्रा, जयंत शुक्ला, धर्मिष्ठा सेंगर, किरण मिश्रा, मनिराम आसटकर, तेजराम भगत, बबन नेवारे, बुधराम निमजे व मुन्ना राणे उपस्थित होते.
चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्किल्ड इंडिया, सेव वॉटर-सेव लाईफ, सेवा चाईल्ड, स्त्री भ्रूण हत्या, महिलांची सुरक्षा आदि विषयांवर पेटींग करून संदेश दिला. स्पर्धेत प्रथम क्रमांक चित्रकला महाविद्यालयाचे विजय कटरे व पलेंद्र गावल यांनी पटकाविला. द्वितीय क्रमांक वैभव मेश्राम व बालू राऊत, तृतीय क्रमांक साक्षी भेलावे, समीक्षा गुप्ता यांनी पटकाविला. विजेत्यांना अग्रवाल यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Web Title: High feat of success through education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.