विनाकारण फिरणाऱ्या २९ जणांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:30 AM2021-05-19T04:30:37+5:302021-05-19T04:30:37+5:30

गोंदिया : लॉकडाऊन सुरू असून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या २९ जणांना शहर व रामनगर पोलिसांनी दणका दिला आहे. यात शहर ...

Hit 29 people wandering for no reason | विनाकारण फिरणाऱ्या २९ जणांना दणका

विनाकारण फिरणाऱ्या २९ जणांना दणका

googlenewsNext

गोंदिया : लॉकडाऊन सुरू असून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या २९ जणांना शहर व रामनगर पोलिसांनी दणका दिला आहे. यात शहर पोलिसांनी २६ तर रामनगर पोलिसांनी ३ जणांवर कारवाई करीत गुन्हा नोंद केला आहे.

रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम कटंगीकला येथील सुभाष चौकात १७ मे रोजी रात्री ३ आरोपी विनाकारण फिरत असताना पोलिसांनी त्यांना पकडले. तर शहर पोलीस ठाण्यांतर्गत मनोहर चौकात दुपारी १ वाजता १० जण विनाकारण फिरताना पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर २ ते २.३० वाजतादरम्यान आणखी १० जण विनाकारण फिरताना मिळून आले. तर ४ ते ४.३० वाजतादरम्यान ६ जण विनाकारण फिरताना मिळून आले. या लोकांनी साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ चे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर रामनगरचे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खामगळ, शहर ठाण्यातील सहायक फौजदार मोरघडे, महिला पोलीस नायक टामेश्वरी पटले व सहायक फौजदार संतोष मोरघरे यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम १८८, २६९, २९० सहकलम ५१ (ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ सहकलम २, ३ साथरोग प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: Hit 29 people wandering for no reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.