धुमाकूळ घालणारा बिबट जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:03 AM2018-08-12T00:03:10+5:302018-08-12T00:03:52+5:30

दिड महिन्यांपासुन प्रतापगड गावात शिरून कोंबड्या, शेळ््या व वासरांची शिकार करु न गावात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला गोठणगाव वनक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी अखेर जेरबंद केले.

Hobnob | धुमाकूळ घालणारा बिबट जेरबंद

धुमाकूळ घालणारा बिबट जेरबंद

Next
ठळक मुद्देवनविभागाला आले यश : प्रतापगडवासीयांनी सोडला सुटकेचा श्वास

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : दिड महिन्यांपासुन प्रतापगड गावात शिरून कोंबड्या, शेळ््या व वासरांची शिकार करु न गावात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला गोठणगाव वनक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी अखेर जेरबंद केले.
यासाठी मागील महिन्याभरापासुन धुमाकुळ घालणाऱ्यां बिबट्याच्या हालचालीवर वनविभागाचे कर्मचारी दिवसरात्र नजर ठेवून होते. बिबट्याच्या गावात येण्याच्या मार्गावर कॅमेरा ट्रॅप बसविले व पगमार्क पॅड तयार केले गेले. एवढेच नव्हे तर गावात वनकर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस गस्त केली. दरम्यान, पिंजऱ्यात कोंबड्यांचा लोभ दाखवला असता शुक्रवारी (दि.१०) रात्री ९.२० मिनीटांनी बिबट पिंजºयात कैद झाला. त्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात आले.
विशेष म्हणजे, बिबट्याला जेरबंद करण्याच्या या कामगिरीत गोठणगावचे वनक्षेत्राधिकारी संजय मेंढे, नवेगावबांध संरक्षण पथक वनक्षेत्राधिकारी विजय सुर्यवंशी, वनरक्षक मिथुन चव्हाण, गोदे, आशिष तुरकर, वनपाल डि.एम.बुरेले, वनरक्षक एल शेळके व वन कर्मचाऱ्यांची सहकार्य केले.

Web Title: Hobnob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.