होळी मिलन व समस्या निवारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:25 AM2021-04-03T04:25:21+5:302021-04-03T04:25:21+5:30

सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर होते. यावेळी पोलीस पाटील जिल्हा संघाचे ...

Holi Reunion and Troubleshooting Meeting | होळी मिलन व समस्या निवारण सभा

होळी मिलन व समस्या निवारण सभा

Next

सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर होते. यावेळी पोलीस पाटील जिल्हा संघाचे अध्यक्ष दिलीप मेश्राम, सचिव राजेश बन्सोड, श्रीराम झिंगरे, उपशाखा अध्यक्ष वनमाली मंडल, टीकाराम कापगते, पोलीस पाटील अनिता लंजे, नंदा ठाकरे, शारदा लंजे, ललीता बोरघरे, गजानन जांभुळकर उपस्थित होते.

सभेमध्ये निलंबित व तीन अपत्यामुळे निलंबित झालेले पोलीस पाटील या विषयावर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे शासनाकडे वाढीव वयोमर्यादा म्हणजे ६० वर्षांचे ६५ वर्षे करण्याची मागणी, निवृत्तीनंतर पेंशन योजनेचा लाभ कोरोनाच्या कालावधीतील अतिरिक्त तीन महिन्यांचे मानधन देण्यात यावे, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. दिवसेंदिवस पोलीस पाटलांवर अत्याचार होऊन गुन्हे दाखल होत आहेत. त्याचे मूळ कारण विस्कळीत संघटना त्याकरिता सर्वांनी एकत्र येऊन संघटना कशी बळकट होईल, यावर मंथन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता उपशाखा देवरी, चिचगड, नवेगावबांध, डुग्गीपार, अर्जुनी-मोरगाव व केशोरी या उपशाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेला सर्व पोलीस पाटील गिरीधर रक्षा, चंदनसिंग जुडा, पेंदाम, कोडापे, योगेश कापगते, कुंभरे, सुभाष मेश्राम, जियालाल पिपरे, रघुनाथ खंजार, चोपराम ठाकरे, राष्ट्रपाल भोवते, विलास लांडगे, उमेश वाढई, दीपक श्यामकुंवर, जयप्रकाश लाडे, अरुण वाडीभस्मे, इंद्रासन सहाळा, प्रेमनाथ देशमुख, जागेश्वर, कृष्णा भोयर, दीनदयाल दुधकवर, राजेंद्र गावळकर, तेजराम कोरेटी उपस्थित होते.

Web Title: Holi Reunion and Troubleshooting Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.