संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली अर्जुनी नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 11:45 PM2018-02-15T23:45:30+5:302018-02-15T23:45:52+5:30

महाराष्ट्राची पारंपारिक नऊवारीसाडी, डोक्यावर ज्योतीकलश, विद्यार्थी-विद्यार्थीनींचे लेझीमपथक, हरिपाठ, राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदायाचे दर्शन घडविणारे दृश्य सारे विलोभनीय होते.

The holy city of Arjuna was purified by saints | संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली अर्जुनी नगरी

संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली अर्जुनी नगरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
संत चोखोबानगरी (अर्जुनी मोरगाव) : महाराष्ट्राची पारंपारिक नऊवारीसाडी, डोक्यावर ज्योतीकलश, विद्यार्थी-विद्यार्थीनींचे लेझीमपथक, हरिपाठ, राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदायाचे दर्शन घडविणारे दृश्य सारे विलोभनीय होते. महाराष्ट्राच्या परंपरेतील विविध वेषभूषेने नटलेल्या या आकर्षक ग्रंथदिंडीने अर्जुनीवासीय भारावले. खऱ्या अर्थाने संताच्या पदस्पर्शाने अर्जुनी मोरगाव नगरी पावन झाली अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. ही दिंडी अभूतपूर्व अशी होती.
सातव्या अखील भारतीय मराठी संत साहितय संमेलनाच्या निमित्ताने गुरुवारी सकाळी ७ वाजता दुर्गा चौक येथून ग्रंथदिंडी निघाली. संत तुकडोजी महाराजांच्या पालखीचे तसेच ग्रंथपूजन करण्यात आले. त्यानंतर दिंडीला सुरुवात झाली. ही दिंडी सुमारे दोन कि.मी. लांब होती. या दिंडीत जि.प. कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती विद्यालय व बहुउद्देशिय हायस्कुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तुकाराम महाराजांपासून तर गाडगेबाबांपर्यंत सर्व तत्कालीन संताचे आकर्षक देखावा (झाकी) बहुउद्देशिय हायस्कुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तुकाराम महाराजांपासून तर गाडगेबाबांपर्यंत सर्व तत्कालीन संताचे आकर्षक देखावा (झाकी) बहुउद्देशिय हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी साकारला होता. प्रजापती ईश्वरीय ब्रम्हकुमारी शाखा अर्जुनी मोरगावच्या वतीने आकर्षक शिव-पार्वती देखावा साकारला होता. यासोबतच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानतर्फे उज्वल प्रभाग संघ, श्री संप्रदाय तालुका सेवा समिती, बहुउद्देशिय हायस्कल, केजाजी महाराज हरिपाठ व दिंडी बाराभाटी, गुरुदेव भजन मंडळ सासरा, विठ्ठल परिवार वारकरी संप्रदाय सानगडी, न्यू राम वारकरी दिंडी सामूदायीक मंडळ घाटबोरी/तेली, सार्वजनिक भागवत सप्ताहमंडळ महागाव, पिंपळगाव/खांबी, अर्जुनी मोरगाव तसेच स्थानिक लोकमत सखी मंच या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.
तिबेटीयन संस्कृती तसेच गौरननगर, पुष्पनगर व दिनकरनगर येथील बंगाली वसाहतीचे हरी मोहंतो यांच्या सहभागामुळे सर्वधर्म समभावाचे दर्शन या ग्रंथदिंडीतून दिसून आले. अर्जुनी नगरीच्या प्रमुख मार्गाने टाळ, मृदंगाच्या गजरात निघालेली ही दिंडी गावकºयांचे लक्ष वेधून घेत होती. अवघडे पंढरपूर येथेच अवतरल्याची प्रचिती येत होती. या ग्रंथदिंडीत एकूण ३७ मंडळ सहभागी झाले होते.
ही दिंडी दुर्गा चौक, मुख्य बाजार चौक, जुने बसस्थानक, महाराणा प्रताप चौक मार्गे कार्यक्रमस्थळी पोहोचली. तेथील प्रवेशद्वारावर दिंडीचे स्वागत व दिंडीत सहभागी झालेल्या संतांना शुभेच्छा देण्यात आल्या. माहेश्वरी मंडळातर्फे दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थी, महिला व पुरुषांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
संमेलनात राजकीय प्रचार
येथील चोखोबानगरीत आयोजित ७ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या सभागृहाबाहेर असलेल्या स्टॉलवरुन राजकीय नेते व पक्षाची निशाणी असलेल्या कॅलेंडरचे वाटप उपस्थितांना केले जात होते. वारकरी साहित्यावर राजकीय वर्चस्व भारी असल्याचे या संमेलनातून दिसून आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या संत मंडळींना नाश्ता वाटप करताना नाश्ता संपला. कित्येजण नाश्त्यापाूसन वंचित राहले. भोजनस्थळी पिण्याच्या पाण्याची अपूरी व्यवस्था होती.

Web Title: The holy city of Arjuna was purified by saints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.