नवकवयित्री रियांशा शहारे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:29 AM2019-02-17T00:29:28+5:302019-02-17T00:30:17+5:30
शब्द हे ज्ञान भांडाराची किल्ली आहे. शब्दाच्या जादूने जीवनातले दु:ख विसरले जातात. तर कधी हेच शब्द सुरुंग बनून अंधाराचा पहाड फोडतात, तर कधी मनावर हळूवार फुंकर घालून खऱ्या जीवनाचे दर्शन घडवून आणत तीव्र इच्छा आकांक्षा उत्पन्न करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शब्द हे ज्ञान भांडाराची किल्ली आहे. शब्दाच्या जादूने जीवनातले दु:ख विसरले जातात. तर कधी हेच शब्द सुरुंग बनून अंधाराचा पहाड फोडतात, तर कधी मनावर हळूवार फुंकर घालून खऱ्या जीवनाचे दर्शन घडवून आणत तीव्र इच्छा आकांक्षा उत्पन्न करतात. उत्तुंग यश मिळविण्याचे स्वप्न उरात जपतात. अशा विविध पाकळ्यांना उमलण्याची तीव्र आशा मनात बाळगणारी चिवट जिद्दीने, स्वकर्तृत्वाने, प्रतिकुल परिस्थितीवर मात करणारी, एकाग्रतेने, उत्साहाने, आनंदाने मेहनत करीत आपल्या स्वप्नांकडे झेप घेणारी चिमुकली मनात निर्माण झालेल्या भावनांना एकत्रितरित्या शब्दांत गुंफून कवितेच्या रुपात मांडून प्रत्यक्षात आणणारी अॅक्युट पब्लिक शाळेची विद्यार्थिनी नवकवयित्री रियांशा शहारे हिला जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवळे यांच्याद्वारे सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्रजी भाषेत प्रकाशित होणारी व ‘लास्ट फ्लॉवर आॅफ स्प्रिंग’ या पुस्तकात २०० कवी-कवयित्री यांच्या काव्याला स्थान देण्यात आला. त्याच पुस्तकात रियांशा शहारे या नवकवयत्रीच्या ‘लोणलीनेस’ या कवितेकरिता तरुण कवयत्री म्हणून तिला मान देण्यात आला. या यशामुळे तिचा जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. रियांशाचे कौतूक संज्योत बहुउद्देशिय शिक्षण संस्थेच्या सहसचिव शुभा शहारे, सर्व शिक्षकांनी कौतूक केले.