सन्मान राष्ट्रध्वजाचा व वृक्षारोपण आज
By admin | Published: August 14, 2014 11:48 PM2014-08-14T23:48:38+5:302014-08-14T23:48:38+5:30
राष्ट्रीय सणांच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची भावना देशवासीयांमध्ये निर्माण व्हावी यासाठी लोकमत युवा नेक्स्ट व सुप्रभात ग्रृप यांच्या संयुक्त विद्यमाने १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य
गोंदिया : राष्ट्रीय सणांच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची भावना देशवासीयांमध्ये निर्माण व्हावी यासाठी लोकमत युवा नेक्स्ट व सुप्रभात ग्रृप यांच्या संयुक्त विद्यमाने १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘सन्मान राष्ट्रध्वजाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन दुपारी ३ वाजता सुभाष बागेत करण्यात आले आहे.
राष्ट्रस्तंभ, राष्ट्रचिन्ह व राष्ट्रध्वज याविषयीचा आदरभाव राखण्याची जागृती अद्यापही देशवासीयांमध्ये निर्माण झाली नाही. त्यामुळेच १५ आॅगस्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशी हातात राष्ट्रध्वज घेवून मिरवणारे त्यानंतर त्यांना इतरत्र फेकून देतात. देशाच्या सन्मानाचे व प्रतिष्ठेचे हे प्रतिक पायाखाली तुडविले जातात. कुठे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर तर कुठे नालीमध्ये पडलेले आढळतात. हा प्रकार टाळण्यासाठी यावेळी जागृती केली जाणार आहे. तसेच वृक्षारोपणही केले जाणार आहे. या कार्यक्रमांव्दारे शहरात जागो-जागी फेकलेले ध्वज उचलून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या सामाजिक बांधीलकीचा मान राखून सदर उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. आपण जागृत भारतीय असल्याचे दर्शन घडविण्याचीर् संधी या उपक्रमाव्दारे आपल्याला प्राप्त करता येणार आहे. त्यामुळे शहरवासीयांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होवून आपले योगदान द्यावे, असे आवाहन लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८८१०११८२१, ९८८१०२७८२१ यावर संपर्क साधावा.