ओबीसी के सन्मान मे, भाजप मैदान मे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:45+5:302021-06-27T04:19:45+5:30
........ गोंदिया जयस्तंभ चौकात रास्ता रोको भारतीय जनता पक्ष गोंदिया शहर व ग्रामीण मंडळातर्फे शनिवारी दुपारी १२ वाजता जयस्तंभ ...
........
गोंदिया जयस्तंभ चौकात रास्ता रोको
भारतीय जनता पक्ष गोंदिया शहर व ग्रामीण मंडळातर्फे शनिवारी दुपारी १२ वाजता जयस्तंभ चौकात चक्का जाम आंदोलन केले. खा. सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी गोपालदास अग्रवाल, रमेश कुथे, माजी जि. प. अध्यक्ष नेतराम कटरे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा महामंत्री संघटन संजय कुलकर्णी, शहराध्यक्ष सुनील केलनका, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक कदम, न.प. सभापती राजकुमार कुथे, न.प. सभापती बंटी पंचबुद्धे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बिसेन, अशोक चौधरी, राजेश चतुर, ऋषिकांत साहू, गजेंद्र फुंडे, मनोज मेंढे, अशोक हरीणखेडे, आदी सहभागी झाले होते.
..........
कोहमारा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन
सडक अर्जुनी : माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात कोहमारा येथे राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर उतरून 'चक्का जाम आंदोलन' करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करवून देत जेलभरो आंदोलन केले. यात ओबीसी आघाडी प्रदेश सदस्य चामेश्वर गहाणे, भाजप तालुकाध्यक्ष अशोक लंजे, जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. भुमेश्वर पटले, जिल्हा सचिव शेषराव गिऱ्हेपुंजे, लक्ष्मीकांत धानगाये, महामंत्री गिरधारी हत्तीमारे, शिशीर येळे, परमानंद बडोले, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री हर्ष मोदी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विलास बागडकर, गौरेश बावनकर, प्रल्हाद कोरे, शहराध्यक्ष राजेश बारसागडे सहभागी झाले होते.
..........
बॉक्स
भाजपच्या आंदोलनाचा पालकमंत्र्यांना फटका
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक शनिवारी तिरोडा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी आपला मार्ग बदलला व तिरोडा येथे धापेवाडा मार्गे तिरोडा येथे आले तेव्हा त्यांना भाजपच्या रास्ता रोको आंदोलनामुळे मार्ग बदलवावा लागला. यामुळे पोलीस यंत्रणेचीसुद्धा तारांबळ उडाली होती.