दहावीच्या परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:15+5:302021-07-19T04:19:15+5:30
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए.पी. मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगांबर कोरे, दहावीचे वर्ग शिक्षक डी. पी. ...
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए.पी. मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगांबर कोरे, दहावीचे वर्ग शिक्षक डी. पी. डोंगरवार, एस. सी. फुंडे, डब्लू. एम. परशुरामकर, आर. जी. पुस्तोडे, वाय. वाय. मौदेकर व पहिले पाच गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. सर्वप्रथम शाळेतून पहिला आलेला होमेश्वर परशुरामकर या विद्यार्थ्याच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दरम्यान, ८७ टक्के गुण घेऊन प्रथम आलेला होमेश्वर परशुरामकर, द्वितीय पायल बडोले आणि मुक्तेश्वर शेंडे (८४ टक्के) तृतीय पवण किरपाणे (८३ .८० टक्के) तर चतुर्थ पूनम चांदेवार (८२.२० टक्के) यांचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शाळा समिती अध्यक्ष कोरे व मुख्याध्यापक मेश्राम यांच्या हस्ते गुलाब पुष्प, मिठाई, पेन, मास्क व थोर पुरुषांचे चरित्र भेट देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक मेश्राम यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मुख्याध्यापक आणि विषय शिक्षकांना दिले. संचालन डोंगरवार यांनी केले. आभार पुस्तोडे यांनी मानले.