रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देणारे हाॅस्पिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:21 AM2021-07-01T04:21:17+5:302021-07-01T04:21:17+5:30
हैदराबाद येथून शिक्षण घेऊन आलेले डॉ. सन्नी सतीश जायस्वाल यांनी सप्टेंबर २०२० मध्ये गोंदिया बालाघाट रोड बसस्थानकाजवळ न्यू लाइफ ...
हैदराबाद येथून शिक्षण घेऊन आलेले डॉ. सन्नी सतीश जायस्वाल यांनी सप्टेंबर २०२० मध्ये गोंदिया बालाघाट रोड बसस्थानकाजवळ न्यू लाइफ हाॅस्पिटलची स्थापना केली. रुग्णांना सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात, हेच एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून त्यांनी या हॉस्पिटलची स्थापना केली. यामुळे अल्पावधीत हे रुग्णालय गोंदिया शहरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात नावारूपास आले. डोकेदुखी, कमर व पायाचे दुखणे, सायटिका, अर्धांगवायू (लकवा), डोक्याला लागलेला मार, ब्रेन ट्यूमर सर्जरी, स्पाइन ट्यूमर सर्जरी, ब्रेन रुमा सर्जरी, स्पाइन ट्रामा सर्जरी, ब्रेन ट्रॉमा सर्जरी, स्पाइन ट्रॉमा सर्जरी, डिस्क प्रोलैप्स सर्जरी, ब्रेन हॅमरेज सर्जरी, न्युरो वास्कुलर सर्जरी, सी.व्ही. जंक्शन सर्जरी, लहान मुलांची न्यूरो सर्जरी आदी विविध प्रकारच्या सर्जरीची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने केवळ गोंदियाच नव्हे, तर लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील रुग्णांनासुद्धा या शस्त्रक्रियेसाठी नागपूर, हैदराबाद, मुंबई येथे यासाठी करावी लागणारी पायपीट कमी झाली. या हाॅस्पिटलमध्ये आतापर्यंत हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हाॅस्पिटलमधून शस्त्रक्रियेनंतर अनेक रुग्ण समाधानाने घरी परतले आहेत. या सर्व शस्त्रक्रिया या महागड्या असल्याने बऱ्याचदा आर्थिक अडचणीसुद्धा पुढे येतात, तेव्हा रुग्णांना यातून मार्ग काढण्यासाठीसुद्धा न्यू लाइफ हाॅस्पिटलच्या माध्यमातून मदत केली जाते. उदा. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील एका ४५ वर्षीय ब्रेन ट्यूमरच्या रुग्णावर येथील जानकी न्यू लाइफ हॉस्पिटल यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपयांचा खर्च येणार होता. मात्र, जानकी हॉस्पिटलचे डॉक्टर सन्नी जायस्वाल यांनी या रुग्णाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्याच्यावर शासकीय योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करून खर्चाची बचत केली. यामुळे या गरीब रुग्णालासुद्धा दिलासा मिळाला. याच रुग्णाप्रमाणे इतरही रुग्णांना शासकीय योजनेतून लाभ मिळवून देत त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आले. जानकी न्यू लाइफ हॉस्पिटलने नेहमीच सामाजिक बांधीलकी जोपासत व्यावसायिकतेला प्राधान्य न देता माणुसकीचे दर्शन देत रुग्णांवर उपचार करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच अल्पावधीतच हे रुग्णालय जिल्ह्यात नावारूपास आले आहे. डॉ. सन्नी जायस्वाल यांनी या रुग्णालयात एकाच छताखाली विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी नागपूर किंवा मुंबई येथे जाण्याचा त्रास कमी झाला आहे.
............
तीस खाटांची सर्व सोयी-सुविधा.
ऑपरेशन सेंटर ओपीडी.
रुग्णांच्या नातेवाइकांची राहण्याची व्यवस्था.
हॉस्पिटल परिसरात स्वच्छतेची काळजी.
कोरोनाकाळात शासकीय मार्गदर्शन.
शासकीय योजनेतून उपचार सुरू होणार.
२४ आकस्मिक सेवा उपलब्ध.
आपल्या सुखी आयुष्याचे दिवस वाढणार.