हॉटेल मालकाला चाकूने तर नोकराला बादलीने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 09:38 PM2019-01-02T21:38:09+5:302019-01-02T21:38:31+5:30

तीन व्यक्ती बसून असताना दोनच नाश्त्याच्या दोनच प्लेट दिल्या यावरून झालेल्या वादात हॉटेल मालकाला चाकूने तर नोकराला बादलीने मारहाण करण्यात आली. फुलचूर नाका येथील दुर्गाभय्या पोहेवाले या हॉटेलात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (दि.१) दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

The hotel owner was knife and the knife was beaten by a bucket | हॉटेल मालकाला चाकूने तर नोकराला बादलीने मारहाण

हॉटेल मालकाला चाकूने तर नोकराला बादलीने मारहाण

Next
ठळक मुद्देसात जणांवर गुन्हा दाखल : फुलचूर नाका येथील हॉटेलातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तीन व्यक्ती बसून असताना दोनच नाश्त्याच्या दोनच प्लेट दिल्या यावरून झालेल्या वादात हॉटेल मालकाला चाकूने तर नोकराला बादलीने मारहाण करण्यात आली. फुलचूर नाका येथील दुर्गाभय्या पोहेवाले या हॉटेलात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (दि.१) दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
हॉटेलात आरोपी आशिष ठाकीर (२४), नारायण शर्मा (२२), चड्डा नागपुरे (२२) हे नास्ता करण्यासाठी गेले. त्यांनी तीन नाश्ता आॅर्डर केल्यावर अनूप दुर्गादास मनिपुरू (२८, रा. शास्त्री वॉर्ड) यांनी दोन प्लेट दिल्या व तिसरी प्लेट आणण्यासाठी जात होते. मात्र आरोपींनी तीन प्लेट सांगितल्यावर दोनच प्लेट कशा दिल्या म्हणून वाद घातला.
या वादात आरोपी गरली शर्मा (२४) याने चाकूने मारून अनूपला गंभीर जखमी केले. तर इतर सहा आरोपींनी त्यांच्या हॉटेलाची तोडफोड केली व यात १२ हजारांचे नुकसान झाले.
तसेच दुकानाच्या कांऊटर मधील ५ हजार रूपये काढून नेले व नोकर रामू गुरूभेले यांना बाल्टीने मारून जखमी केले.
सदर घटनेसंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम ३९५, १४३, १४४, १४७, १४८, ४५२, ४२७, ५०४, ५०६, ३२४, ३३२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: The hotel owner was knife and the knife was beaten by a bucket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.