पावसामुळे घर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 09:03 PM2018-08-23T21:03:37+5:302018-08-23T21:04:07+5:30

तिरोडा तालुक्यातील करटी (खुर्द) येथील एक घर पावसामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाले. परिणामी सदर कुटुंबीयांवर उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. महसूल विभागाने पडलेल्या घराचा पंचनामा केला मात्र आर्थिक मदत मिळणार नसल्याचे सांगितले.

The house collapsed due to the rain | पावसामुळे घर कोसळले

पावसामुळे घर कोसळले

googlenewsNext
ठळक मुद्देकरटी येथील कुटुंबीयांवर संकट : आर्थिक मदत व घरकूल मंजूर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : तिरोडा तालुक्यातील करटी (खुर्द) येथील एक घर पावसामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाले. परिणामी सदर कुटुंबीयांवर उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. महसूल विभागाने पडलेल्या घराचा पंचनामा केला मात्र आर्थिक मदत मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदर कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.
प्राप्त माहितीनुसार करटी (खु.) येथे २० आॅगस्टच्या दुपारी ४.३० च्या दरम्यान मुसळधार पाऊस आला. सायंकाळी ७ वाजता कुंदना वीरेंद्र चौरे (४५), दिव्या (१९) आणि सीया (१६) घरी जेवन करुन घराबाहेर आले असता याच दरम्यान त्यांचे घर पूर्णपणे कोसळले. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. मात्र घरातील संपूर्ण साहित्याचे नुकसान झाले. त्यामुळे चौरे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले असून उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. दरम्यान या सर्व प्रकाराची माहिती तहसीलदार संजय रामटेके, तलाठी आणि उपविभागीय अधिकारी तिरोडा यांना देण्यात आली.
तहसीलदारांनी तलाठ्याला पाठवून पंचनामा करुन लेखी अहवाल मागीतला. कवलेवाडा जि.प.क्षेत्राचे सदस्य मनोज डोंगरे यांनी भेट देवून पाहणी केली. या वेळी सरपंच वर्षा प्रकाश मालाधारी, पोलीस पाटील, अरविंद चौरे, ग्रा.पं. सदस्य सुधाकर नागपुरे, छगनलाल ठाकरे उपस्थित होते. दरम्यान आपदग्रस्त चौरे कुटुंबीयांना त्वरीत आर्थिक मदत व घरकुल मंजूर करण्याची मागणी केली जात आहे.
तिरोड्यात अतिवृष्टी, करटीत नाही
२० आॅगस्टला तिरोडा शहरात अतिवृष्टीची नोंद झाली. करटी खुर्द हे तिरोड्यावरुन ८ कि.मी. अंतरावर आहे. मात्र येथे अतिवृष्टीची नोंद झाली नसल्याने चौरे कुुटुंबीयांना आर्थिक मदत व घरकुलाचा लाभ देता नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी
पावसामुळे कुंदना चौरे यांचे घर कोसळल्याने त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

Web Title: The house collapsed due to the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस