पुतळी येथे घर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:14 AM2019-08-10T00:14:38+5:302019-08-10T00:14:54+5:30
सडक अर्जुनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पुतळी येथील शेतमजूर प्रकाश बाबुराव लांजेवार यांचे ७ आॅगस्टच्या मध्यरात्री अतिवृष्टीने राहते घर कोसळले. यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पुतळी येथील शेतमजूर प्रकाश बाबुराव लांजेवार यांचे ७ आॅगस्टच्या मध्यरात्री अतिवृष्टीने राहते घर कोसळले. यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची माहिती कोयलारी येथील तलाठ्याला देण्यात आली असून नुकसानीचा पंचनामा करुन पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार सडक अर्जुनी यांचेकडे पाठविण्यात आला आहे.
प्रकाश लांजेवार यांचे कुटुंब साखर झोपेत असताना बुधवारी रात्री अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्रीची वेळ असल्याने घर कोसळल्याचा जोरात आवाज आला त्यामुळे घराशेजारील लोक मदतीला धावून आले.
घर कोसळल्यामुळे लांजेवार कुटुंबीयांना राहण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे शेजारच्या लोकांची त्यांच्या कुटुंबीयांची राहण्याची सोय करुन दिली.या घटनेची माहिती दुसऱ्याच दिवशी महसूल विभागाच्या कोयलारी येथील तलाठी कार्यालयाला देण्यात आली.
यासंदर्भात शासनाने त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.