घरकुल बांधकामात घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:12 PM2018-03-24T22:12:04+5:302018-03-24T22:12:04+5:30
पंचायत समिती आमगाव अंतर्गत येणाºया मौजा जामखारी येथील विविध शासकीय योजनेतंर्गत तयार करण्यात आलेल्या घरकुल, शौचालय व गुरांचे गोठे बांधकामात घोळ करण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
आमगाव : पंचायत समिती आमगाव अंतर्गत येणाºया मौजा जामखारी येथील विविध शासकीय योजनेतंर्गत तयार करण्यात आलेल्या घरकुल, शौचालय व गुरांचे गोठे बांधकामात घोळ करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. मात्र याचा फटका इतरही लाभार्थ्यांना बसला असून त्यांना न्याय देण्याची मागणी जामखरी येथील लाभार्थ्यांनी केली आहे.
मौजा जामखारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचे बांधकाम करण्यात आले. लाभार्थ्यांनी ज्या जागेचा ‘नमुना ८’ जोडला त्या जागेवर प्रत्यक्ष बांधकाम न करता दुसरीकडे केले आहे. मागील २० वर्षापासून जे व्यक्ती गावातच राहत नाही अशा व्यक्तींच्या नावे घरकुल, शौचालय मंजूर करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठांकडे तक्रार करुन चौकशी करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे याच गावात ज्यांची घरे जीर्ण झाली आहेत व ज्यांना खरोखरच घरकुलाची गरज आहे. त्यांना मात्र घरकुलापासून वंचित ठेवण्यात आले. जामखारी येथील अर्जदारांच्या तक्रारीनुसार सीआयडी ट्रस्टचे डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट तेथे गेले असता तेथील लोकांनी आपल्या व्यथा सांगितल्या. त्या वार्ड क्र.२ मध्ये जाऊन शहानिशा केले असता काही व्यक्तींचे घरे अत्यंत जीर्ण अवस्थेत आढळले. त्यांचे घरकुल मागील वर्षीच मंजूर झाले आहेत. पण अद्यापही बांधकामास सुरुवात झाली नाही. अर्जात म्हटले आहे की, पदाधिकारी यांनी घरकुल लाभार्थ्यांडून पैसे घेवून अपूर्ण असलेल्या घरकुलांना पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप. याच गावातील एका लाभार्थ्याला शासकीय योजनेतून घरकुल बांधकाम केले. मात्र शौचालय न बांधता त्यांना ग्रामपंचायतने दुसºयाच्या शौचालयाचे फोटो जोडून निधीची उचल केल्याचा आरोप आहे. जामखारी येथे विविध शासकीय योजना व घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता असून त्याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी व जि.प.मुख्यकार्यकारी अधिकाºयांना केलेल्या तक्रारीतून केली आहे.