साडेतीन वर्षातच भाजपचे नेते वाईट कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:23 AM2018-05-26T00:23:41+5:302018-05-26T00:23:41+5:30

साडेतीन वर्षापूर्वी माजी खासदार पटोले यांच्यासाठी भाजप नेते सर्वात चांगले होते. पण, साडेतीन वर्षातच ते वाईट कसे झाले हे त्यांनी जनतेला सांगावे. असे आव्हान राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.

How can the BJP leaders be wrong within three and a half years? | साडेतीन वर्षातच भाजपचे नेते वाईट कसे?

साडेतीन वर्षातच भाजपचे नेते वाईट कसे?

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : साडेतीन वर्षापूर्वी माजी खासदार पटोले यांच्यासाठी भाजप नेते सर्वात चांगले होते. पण, साडेतीन वर्षातच ते वाईट कसे झाले हे त्यांनी जनतेला सांगावे. असे आव्हान राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.
भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे अधिकृत उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ईळदा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
या वेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, काशीम जामा कुरेशी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, लायकराम भेंडारकर, उमाकांत ढेंगे, रघुनाथ लांजेवार, प्रकाश गहाणे, तेजुकला गहाणे, अनिल ताराम, कल्पना राऊत, सरपंच नीता धुर्वे, श्रीमती लांजेवार, डॉ. जतीन मंडल, अर्चना राऊत, संतोष सरकार, विनोंद डोंगरवार, रामदास कोहाडकर उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले ही निवडणूक जनतेला नको असताना लादली गेली आहे. निवडणूक लादणाऱ्याला कार्यकर्ते आणि मतदारांनी धडा शिकवला पाहिजे.
आधी भाजपाचे नेते चांगले आहेत, असे म्हणणाऱ्याला आता ते वाईट असल्याचा साक्षात्कार झाला काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. ६० वर्षे काँग्रेसने या राज्यावर सत्ता केली. गरीबी हटावचा नारा दिला. पण गरीबी हटली नाही उलट गरीबच हटला.
आमचे सरकार फक्त ४ वर्षाचे आहे. ४ वर्षात आमच्या सरकारने काँग्रेसच्या ६० वर्षात झाले नसतील तेवढी कामे झाल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. दिनकरनगर, महागाव, अरुणनगर येथे देखील बावनकुळे यांची प्रचार सभा झाली.

Web Title: How can the BJP leaders be wrong within three and a half years?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.