कसे मिळविणार हिवतापावर नियंत्रण?

By admin | Published: June 18, 2015 12:49 AM2015-06-18T00:49:59+5:302015-06-18T00:49:59+5:30

पावसाळ्याच्या दिवसांत विविध आजार पसरतात. त्यांना नियंत्रित करण्यात आरोग्य व जिल्हा हिवताप कार्यालय ...

How to control malaria? | कसे मिळविणार हिवतापावर नियंत्रण?

कसे मिळविणार हिवतापावर नियंत्रण?

Next

५७ पदे रिक्त : कंत्राटी आरोग्य सेवकांचे मानधन प्रलंबित
गोंदिया : पावसाळ्याच्या दिवसांत विविध आजार पसरतात. त्यांना नियंत्रित करण्यात आरोग्य व जिल्हा हिवताप कार्यालय अपयशी ठरत आहे. अनेक रूग्णांचा बळी जातो. त्यातच जिल्हा आरोग्य विभागात मंजूर नियमित ९८ पैकी ५७ पद रिक्त आहेत. तसेच मंजूर १६ कंत्राटी आरोग्य सेवकांचे मानधन निधी नसल्यामुळे प्रलंबित आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभाग आणखी किती जणांचे बळी घेणार? असा प्रश्न उपस्थित होते आहे.
देवरी, सालेकसा, अर्जुनी-मोरगाव व तिरोडा या तालुक्यांमध्ये पावसाळ्यात अनेक संक्रामक आजार पसरतात. मात्र कोट्यवधी रूपये खर्चून जनतेला आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रचार करणाऱ्या आरोग्य विभागाला रिक्त पदांमुळे मृतकांची संख्या सांगण्यात काहीच गैर वाटत नाही. ग्रामीण व शहरी क्षेत्रात आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले आहे. सर्व नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, हा यामागील हेतू होता. आरोग्य उपकेंद्र ते जिल्हा परिषद व जिल्हा सामान्य रूग्णालय ते जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय सर्वांनाच कोट्यवधी रूपये खर्च करण्याची सूट दिली आहे. परंतु हा निधी केवळ खरेदी व बांधकाम कार्यावरच खर्च होते. खरे पाहता सामान्य नागरिकांना आतासुद्धा खासगी डॉक्टरांवरच अवलंबून रहावे लागते.
देवरी, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा तालुक्याच्या जंगलव्याप्त क्षेत्रात रूग्णालये आहेत. परंतु अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे अप्रिशिक्षित खासगी डॉक्टरांना देवच पावतो. सुरू वित्तीय वर्षात तीन महिन्यांत चार जणांना हिवतापामुळे प्राणास मुकावे लागले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील विहीरगाव, केशोरी आदी गावांत नागरिकांना हिवताप व डेंग्यू आजारांनी ग्रासले. मागील वर्षी पावसाळ्यात अनेक गावांत संक्रमक आजार पसरले होते. वेळेवरच झोपेतून जागे होणारा आरोग्य विभाग काय कामाचा.
हिवताप नियंत्रित करण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आली. राज्य शासनाच्या वतीने या विभागास फवारणी, संक्रमक आजारांवर नियंत्रण, रक्ताच्या नमूण्यांची तपासणी आदी कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु प्रामुख्याने गाव स्तरावर कार्य करणाऱ्या आरोग्य सेवकांचे पद अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे या विभागाची उद्दिष्टपूर्ती होत नाही. (प्रतिनिधी)

हिवताप निर्मूलनावर प्रश्नचिन्ह
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाला नियमितरित्या ९८ आरोग्य सेवकांच्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी ५७ पद आजही रिक्तच आहेत. तसेच १६ कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सेवकांचे पद रिक्त आहेत. ३१ मार्च २०१४ पासून निधी नसल्याचे कारण सांगून ही पदे अद्याप भरण्यात आली नाहीत. त्यामुळे संक्रामक आजार व हिवतापाचे निर्मूलन कसे होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
फवारणीच्या औषधांची समस्या
जिल्हा आदिवासीबहुल आहे. त्यामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून या क्षेत्रात फवारणी करण्यासाठी ‘अल्फ्रामेथिन’ व इतर पॉवडर दुसऱ्याच जिल्ह्यात पाठविण्यात येत असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात साठवण करून योग्य वेळी औषध रवाना केली जात असल्याची चर्चा सुरू आहे.

Web Title: How to control malaria?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.