अजून किती दिवस धोका पत्करायचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 09:09 PM2019-04-04T21:09:42+5:302019-04-04T21:12:00+5:30

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो कोणत्याही क्षणी कोसळू शकते असे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले. प्रशासनाने सुध्दा याची खातरजमा करण्यासाठी पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट केले.त्यात सदर उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी धोकादायक असल्याची बाब पुढे आली होती.

How long does it take to risk | अजून किती दिवस धोका पत्करायचा

अजून किती दिवस धोका पत्करायचा

Next
ठळक मुद्देशहरवासीयांचा प्रशासन आणि लोकप्रतिधिनींना सवाल : जुन्या जीर्ण उड्डाणपुलाची समस्या कायम

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो कोणत्याही क्षणी कोसळू शकते असे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले. प्रशासनाने सुध्दा याची खातरजमा करण्यासाठी पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट केले.त्यात सदर उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी धोकादायक असल्याची बाब पुढे आली होती.मात्र याला आठ महिन्यांचा कालावधी लोटला असून अद्यापही याची दखल घेण्यात आली नाही.
या पुलावरुन दुचाकी आणि तिनचाकी वाहने सर्रासपणे धावत आहे. मात्र शहरावासीयांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या या मुद्दाची ना प्रशासन ना लोकप्रतिनिधींनी दखल घेतली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरवासीयांनी अजून किती दिवस आम्ही धोका पत्थकारायचा असा सवाल उपस्थित केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत जवळपास ९० वर्षांपूर्वी शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावर उड्डाणपूल तयार करण्यात आला. याच पुलाच्या खालून रेल्वेचा ट्रॅक गेला आहे. या उड्डाणपुलाला बरीच वर्षे झाली असल्याने व रेल्वे ट्रॅक परिसरातील उड्डाणपुलाचा काही भाग जीर्ण होवून तो कोसळत असल्याने याची तातडीने दखल घेत पुलाची रेल्वे विभागाच्या तांत्रिक विभागाकडून पाहणी केली. त्यात जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याची बाब पुढे आली. त्यामुळे त्यांनी याची गांर्भियाने दखल जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पत्र दिले. तसेच या पुलावरील सर्व जड वाहतूक तातडीने बंद करुन सहा महिन्यात जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याची सूचना केली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने थातुरमातुर दुरूस्ती करुन व हा पूल पाडून त्याठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी ८४ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. याला सहा महिन्याचा कालावधी लोटला असून अद्यापही यावर कुठलीच कारवाही झाली नाही. ऐवढ्या गंभीर प्रशासनाने आपले हात झटकले असताना लोकप्रतिनिधीनी सुद्धा यात पुढाकार न घेतल्याने शहरवासीयांच्या सुरक्षेची कुणालाच काळजी नसल्याचे आता शहरवासीय बोलू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमतने या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

जुना डेंजर तर नवीन सदोष
जुन्या उड्डाणपुलाला पर्याय म्हणून तीन वर्षांपूर्वी गोंदिया बालाघाट मार्गावर ५४ कोटी रुपये खर्चून नवीन उड्डाणपूल तयार करण्यात आला. मात्र या पुुलाचे बांधकाम करताना पुलाच्या दोन्ही बाजूला पादचारी पूल तयार करण्याचा दोन्ही विभागाला विसर पडल्याने या मार्गावर पादचाऱ्यांना चालणे म्हणजे जीव गमाविण्याचे झाले आहे. त्यामुळे जुना डेंजर तर नवीन सदोष अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शहरवासीयांना त्रास
गोंदिया शहराची लोकसंख्या दीड लाखांच्यावर तसेच पुलाच्या दोन्ही बाजुला शहराचा विस्तार झाला आहे. त्यामुळे या दोन्ही बाजुला जोडण्यासाठी जुना उड्डाणपूल महत्त्वपूर्ण होता. शिवाय पुलावर सर्वाधिक वर्दळ सुध्दा राहत होती. मात्र सध्या जुन्या उड्डाणपुलावरुन केवळ दुचाकी आणि तिनचाकी वाहनांना प्रवेश दिला जात असल्याने वाहन चालकांना वळसा घालून यावे लागत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे.
आतापर्यंत नेमके काय झाले
1जीर्ण जुन्या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करुन उड्डाणपुलाची तात्पुरती दुरूस्ती.
2 रेल्वे विभागाने दिलेल्या इशारा लक्षात घेवून या पुलावरुन जड वाहनाना प्रवेश बंदी
3 जुन्या उड्डाणपुलावरुन चारचाकी वाहने जावू नये यासाठी पुलाच्या दोन्ही बाजुला बॅरिकेट्स लावले.
4 सार्वजनिक बांधकाम विभागाने जुना उड्डाणपूल पाडून नवीन पूल तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला.
पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या जीर्ण झालेल्या उड्डाणपुलाचे सार्वजनिक बांधकाम, रेल्वे विभाग आणि तज्ज्ञांकडून स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले. त्यात हा पूल वाहतुकीसाठी डेजंर असल्याची बाब पुढे आली. मात्र यानंतर यावर ठोस उपाय योजना न करता जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने एकमेकांकडे बोटे दाखवित जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
तज्ज्ञांचे मत
जुन्या जीर्ण उड्डाणपुलाची समस्या लक्षात घेवून हा पूल पाडून नवीन पूल तयार करण्यासाठी शासनाकडे ८४ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच पुलाचे काम सुरू करण्यात येईल.
- मिथिलेश चव्हाण, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.

Web Title: How long does it take to risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.