शाळांना विद्यार्थ्यामागे किती रुपये मिळतात? शाळांचे पैसे आहेत शासनाकडून थकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 17:24 IST2025-03-01T17:23:16+5:302025-03-01T17:24:15+5:30

Gondia : यंदा १०११ जागांसाठी प्रवेश प्रक्रीया

How much rupees do schools get per student? Schools are yet to funded by the government | शाळांना विद्यार्थ्यामागे किती रुपये मिळतात? शाळांचे पैसे आहेत शासनाकडून थकून

How much rupees do schools get per student? Schools are yet to funded by the government

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना खासगी विनाअनुदानित स्वयंअर्थसाहायित शाळांमध्ये उच्च प्राथमिक स्तरापर्यंत विनामूल्य शिक्षण देण्यात येते. 'आरटीई' अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती सरकारने प्रतिवर्षी निश्चित केलेले दर आणि शाळांनी त्या-त्या वर्षी ठरवलेले शुल्क (फी) यापैकी जे कमी असेल, त्यानुसार संबंधित शाळांना आकारणी होते.


या विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती शिक्षण विभागाकडून शाळांना केली जाते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या शुल्क प्रतिपूर्तीचा दर निश्चितीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 


खासगी शाळांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी प्रतिविद्यार्थी १७ हजार ६७० रुपये या दराने शुल्क प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे.


१५६ बालकांचे प्रवेश आरटीईत कन्फर्म
आरटीईअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात १२८ शाळांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात एक हजार ११ जागा आहेत. यासाठी तीन हजार ३०४ अर्ज आले असून, गुरुवारपर्यंत १५६ बालकांचे प्रवेश कन्फर्म करण्यात आले आहे.


३१ कोटी रुपये शाळांचे थकले
आरटीईअंतर्गत वंचित व दुर्बल घटकांतील मुलांसाठी मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येते. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासनामार्फत केली जाते. सन २०२२-२३ आणि सन २०२३-२४ या वर्षाचा निधी थकीत आहे. तसेच २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा निथी मिळालेला नाही. गोंदिया जिल्ह्यातच ही रक्कम ३१ कोटी रुपये असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.


शिक्षणाचा अधिकार कायदा
२००९ अर्थात 'आरटीई' नुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले जातात. प्रत्येक लाभार्थी
विद्यार्थ्यांची फी म्हणून शासनाकडून १७,६७० रुपये खासगी शाळांना देण्यात येत आहे. मात्र, अनेक वर्षांपासून या रकमेत काहीही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे वाढत्या महागाईच्या अनुषंगाने 'आरटीई' अंतर्गत मिळणाऱ्या प्रतिपूर्ती रकमेत ७५ टक्क्यांपर्यंत वाढ करावी, अशी मागणी आता शाळांकडून करण्यात येत आहे.


'आरटीई'चे शुल्क तुटपुंजे
महागाईच्या ओझ्यामुळे खासगी शाळांचे हाल होत आहे. प्रतिपूर्ती रक्कम ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.


तालुक्यात किती प्रवेश?
तालुका               शाळा            जागा               प्रवेश

अर्जुनी-मोरगाव        १२              ७९                  १४
आमगाव                 ११              १२०                 १८
देवरी                     ०८              ४८                   ११
गोंदिया                  ४८              ४१८                 ४२
गोरेगाव                  १५              ८६                   २१
सालेकसा               ०५                ४१                  २१
सडक-अर्जुनी          १०               ५३                   ०९
तिरोडा                   १९              १६६                  २०
एकूण                   १२८             १०११                 १५६

Web Title: How much rupees do schools get per student? Schools are yet to funded by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.