बारावीची परीक्षा सुरळीत सुरु
By admin | Published: March 1, 2017 12:33 AM2017-03-01T00:33:42+5:302017-03-01T00:33:42+5:30
पोलिसांचा चोख बंदोबस्त : दक्षता समितीही परीक्षेवर नजर ठेवून
गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी उच्च माध्यमिक (बारावी) परिक्षा मंगळवारपासून (दि.२८) शांततेत सुरू झाली. जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांत ही परीक्षा घेतली जात असून परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्तासह दक्षता समिती नजर ठेवून आहे.
समर्थ कनिष्ठ महाविद्यालय
ैकेशोरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेतली जाणारी बारावीची परीक्षा येथील समर्थ आदिवासी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात (केंद्र क्रमांक ७६४) सुरळीत सुरु झाली. या केंद्रामधून एकूण ४५५ परीक्षार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने नवोदय कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालय, विदर्भ कनिष्ठ महाविद्यालय, प्रगती कनिष्ठ महाविद्यालय आणि समर्थ आदिवासी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या केंद्रावर केंद्र संचालक म्हणून रामू लंजे तर अतिरिक्त केंद्र संचालक मानवता कनिष्ठ महाविद्यालयातील वामन चुटे परीक्षा संचालनाचे काम सांभाळीत आहेत.
जि.प.कनिष्ठ महाविद्यालय
परसवाडा : येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात (केंद्र क्रमांक ७५१ व ३२७) एकूण ३२८ परीक्षार्थी परिक्षा देत आहेत. इंग्रजीचा पेपर असल्याने केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. केंद्र संचालक डी.व्ही. कवाने व अतिरिक्त संचालक कळमकर काम पाहत आहेत.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अडीच हजार विद्यार्थी
बोंडगावदेवी : नागपूर बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता १२ वीची परीक्षा सुरु झाली असून अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७ परीक्षा केंद्रामधून दोन हजार ५३८ विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्यात आल्याचे परीरक्षक तथा गटशिक्षणाधिकारी टी.बी. भेंडारकर यांनी सांगितले.
अर्जुनी-मोरगाव येथील सरस्वती विद्यालय (केंद्र क्रमांक ७२२) या परीक्षा केंद्रामधून ४२४ विद्यार्थी, शामाप्रसाद विद्यालय महागाव (७२३) २३३ विद्यार्थी, पंढरीबापू देशमुख विद्यालय महागाव (७२४) २०० विद्यार्थी, मानवता विद्यालय बोंडगावदेवी (७२५) ४७५ विद्यार्थी, जिल्हा परिषद नवेगावबांध (७२६) ४८१ विद्यार्थी, ईसापूर-ईटखेडा विद्यालय ईटखेडा (७२७) २७१ विद्यार्थी, श्री समर्थ आदिवासी विद्यालय केशोरी (७६४) ४५४ विद्यार्थी असे दोन हजार ५३८ विद्यार्थी १२ वीची परीक्षा देत आहेत.
इटखेडा-इसापूर कनि.महाविद्यालय
इटखेडा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी उच्च माध्यमिक (बारावी) परिक्षा येथील इसापूर-इटखेडा कनिष्ठ महाविद्यालयात (केंद्र क्रमांक ७२७) शांततेत सुरू झाली. या केंद्रातून २७१ परिक्षार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले आहेत. या इसापूर-इटखेडा कनिष्ठ महाविद्यालय, स्वामी विवेकानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, सुधाकरराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय, बोळदे/करडगाव व गौरनगर येथील जयदुर्गा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी परिक्षा देत आहेत.
केंद्र संचालक म्हणून प्रा. भगवंतराव फुलकटवार तर अतिरीक्त केंद्र संचालक म्हणून अर्जुनी-मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. ओ.डी.लांजेवार परिक्षेचे संचालन करीत आहेत. परिक्षेला घेऊन पोलीस बंदोबस्त असून दक्षता समितीची देखरेख असल्याने परिक्षा शांततेत सुरू झाली. (वार्ताहर)