मोदक स्पर्धेला उदंड प्रतिसाद
By admin | Published: September 15, 2016 12:33 AM2016-09-15T00:33:36+5:302016-09-15T00:33:36+5:30
गणपती महोत्सवाचे औचित्य साधून स्थानिक गजानन मंदिर सिव्हील लाईन गोंदिया येथे मोदक बनाओ व वन मिनीट गेम शोचे आयोजन करण्यात आले होते.
गोंदिया : गणपती महोत्सवाचे औचित्य साधून स्थानिक गजानन मंदिर सिव्हील लाईन गोंदिया येथे मोदक बनाओ व वन मिनीट गेम शोचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरूवात श्री गणेश यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. स्पर्धेमध्ये एकूण ३५ सखी सहभागी झाल्या होत्या. मोदक बनाओ या स्पर्धेमध्ये प्रथम सरोजनी लांजेवार, द्वितीय वंदना अनगुरे, तृतीय पुष्पा अंबुले यांनी पटकाविले. सर्व स्पर्धकांना तसेच विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व बक्षीस देण्यात आले. संचालन व आभार लोकमत इव्हेंट्सच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत यांनी तर आभार विभाग प्रतिनिधी योगीनी पथ्थे यांनी मानले. यशस्वीतेसाठी रुपाली खराबे, स्मिता शरणागत, शालू कृपाले, हिमेश्वरी कावळे यांनी सहकार्य केले.
देवरी : गणपती उत्सवाचे औचित्य साधून स्थानिक माँ धुकेश्वरी सभागृहात देवरी येथे मोदक बनाओ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरूवात लोकमत सखी मंचच्या संस्थापिका स्व. जोत्सना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून प्रज्ञा संगीडवार, प्रा. वर्षा गंगणे उपस्थित होत्या. मोदक बनाओ स्पर्धेमध्ये एकूण २० सखींनी भाग घेतला. यामध्ये प्रथम रोशनी राजग्री, द्वितीय शुभांगी घोडेसेवार, तृतीय गीता शाहू यांनी पटकाविला. अतिथीच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
संचालन व आभार लोकमत सखी मंचच्या तालुका संयोजिका क्षिप्रा तिराले यांनी केले. यशस्वीतेसाठी स्मिता पिल्लेवार, सोनीया मीते, कपाली शाहू, लक्ष्मी पंचमवार, गायत्री पारधी, पुष्पा धुर्वे, कवीनी मडावी यांनी सहकार्य केले.
गोरेगाव : गणपती उत्सवाचे औचित्य साधून लोकमत सखी मंच गोरेगावच्या वतीने स्थानिक एकदंत गणेश मंदिर येथे मोदक बनाओ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व श्री गणेश यांच्या प्रतिनीधीला माल्यार्पण करुन करण्यात आली. यामध्ये प्रथम रिया येडे, द्वितीय प्रगती भड तर तृतीय आशा पाटील यांनी पटकाविला. संचालन संयोजिका वैशाली कोटेवार यांनी केले. यशस्वीतेसाठी लक्ष्मी चौरसिया, गीता तांडेकर, दिप्ती बारेवार, वंदना पटीये, निर्मला भुरे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)