‘शाळाबाह्य मूल दाखवा’ अभियानाला शंभर टक्के प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 08:04 PM2018-12-25T20:04:24+5:302018-12-25T20:04:47+5:30
भीक मांगून पोट भरणाऱ्या व बालमजूरी करणाºया बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. त्यांतर्गत एकही बालक शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात शाळाबाह्य मुले तर नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने शाळाबाह्य मूल दाखवा व १ हजार रूपये पुरस्कार घ्या असा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला जिल्ह्यातील १०६५ शाळांनी फलक लावून सहकार्य केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भीक मांगून पोट भरणाऱ्या व बालमजूरी करणाºया बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. त्यांतर्गत एकही बालक शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात शाळाबाह्य मुले तर नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने शाळाबाह्य मूल दाखवा व १ हजार रूपये पुरस्कार घ्या असा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला जिल्ह्यातील १०६५ शाळांनी फलक लावून सहकार्य केले.
एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये व त्या मुलांना गुणवत्तायुक्त शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीई कायद्यांतर्गत एकही मूल शाळाबाह्य राहू नये त्यासाठी तजविज केली. तसेच स्थानिक प्राधीकरणातील प्रत्येक पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी शाळा बाह्य मुलांना शोधण्याची आहे हे नमूद केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळांना शाळाबाह्य मुलांची माहिती मागीतली तेव्हा ती यादी शून्य दाखविली जाते. परंतु वास्तविकता वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शाळाबाह्य मूल दाखवा व १ हजार रूपये बक्षीस मिळवा असा उपक्रम जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सुरू केला. या उपक्रमाला जिल्ह्यातील सर्वच शाळांनी भरभरून प्रतिसाद दिला.
१ नोव्हेंबर २०१८ पर्यंत कधीच शाळेत दाखल न झालेल्या शाळाबाह्य मुलांना दाखविल्यास किंवा ३० दिवस सतत गैरहजर असलेल्या मुलांची माहिती गटशिक्षणाधिकाºयांमार्फत देण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कुडवा, रेल्वे स्थानक, काचेवानी, मुंडीकोटा, सौंदड येथे भीक मागणाºया, मांगगारुडी, लोहार, फिरणारे नाथजोगी यांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहेत. शाळाबाह्य मूलांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागासमोर ‘शाळाबाह्य मूल दाखवा १ हजार रूपये मिळवा’ असे फलक लावण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन सर्वच शाळांनी केले आहे. ज्या परिसरात शाळाबाह्य मूल आढळेल त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला माहिती देणाºयास १ हजार रूपये बक्षीस म्हणून द्यावे लागतील या भितीने शिक्षकांनीच शाळाबाह्य मूल शोधण्यासाठी प्रयत्न केले.
अचूक नियोजन, १०० टक्के नोंदणी
जिल्हा परिषदेने शाळाबाह्य मूल दाखवा व १ हजार रूपये पुरस्कार मिळवा हा उपक्रम राबविण्यासाठी मुख्याध्यापकांनी अचूक नियोजन केले. बक्षीस द्यावे लागणार नाही यासाठी १०० टक्के पटनोंदणी करा असे निर्देश मुख्याध्यापकांना दिले होते. लोकांना बक्षीस द्यायची वेळ येऊ नये म्हणून शिक्षकांनीच शाळा बाह्य मूूल आपल्या शाळेच्या ६ किमी. अंतरात राहू नये याची काळजी घेतली.