गोंदिया जिल्ह्यात उष्णतेमुळे शेकडो मासोळ्या मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:52 PM2019-05-28T12:52:25+5:302019-05-28T12:53:23+5:30
असह्य उष्णतेमुळे जिल्ह्यातल्या गोरेगाव तालुक्यातील तेढा गावात असलेल्या तलावातील शेकडो मासोळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: असह्य उष्णतेमुळे जिल्ह्यातल्या गोरेगाव तालुक्यातील तेढा गावात असलेल्या तलावातील शेकडो मासोळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. विदर्भात तापमानाचा पारा ४६ अंशाच्या पुढे सरकला आहे. नवतपा या नऊ दिवसात तर तो ४७ अंशांपर्यंत पोहचत असतो. या उष्णतेची झळ बसून कित्येक प्राणी, लहान चिमण्या, पक्षी कोसळून जमिनीवर पडतात. अशातच तलावातल्या या मासोळ्यानाही उष्ण पाण्याचा चटका सहन करावा लागल्याने त्यांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. शेकडो मासोळ्या तलावाच्या पृष्ठभागावर मृतावस्थेत तरंगताना दिसत आहेत. या तलावाचे जलक्षेत्र २९ हे. आर. एवढे आहे. या तलावात मच्छीमारी करणाऱ्या बांधवांनी शासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.