बारदाण्याअभावी शेकडो क्विंटल धान उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:18 AM2018-11-22T00:18:59+5:302018-11-22T00:19:27+5:30
येथील आदिवासी सहकारी सेवा सहकारी संस्थेत मागील महिनाभरापासून बारादाणा उपलब्ध नसल्याने धान विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेवून धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : येथील आदिवासी सहकारी सेवा सहकारी संस्थेत मागील महिनाभरापासून बारादाणा उपलब्ध नसल्याने धान विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेवून धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.
या सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन महिनाभरापूर्वी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. सदर धान खरेदी करणारी संस्था शेतकऱ्यांच्या विश्वासाची असल्याने या केंद्रावर शेतकरी मोठ्या प्रमाणात धान विक्रीस आणतात. मात्र यंदा सुरूवातीपासूनच बारदाणा उपलब्ध करुन देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
संस्थेला सुरूवातीला बारदान्याऐवजी ७१०० कट्टे उपलब्ध करुन देण्यात आले. खरेदी केंद्रावर शेतकºयांना बारदाना उपलब्ध होत नसल्याने धान विक्रीस आणण्याकरिता अडचण निर्माण होत आहे. तर बारदाण्याअभावी शेकडो क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. या आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थे अंतर्गंत येणाऱ्या धान खरेदी केंद्रात १३ गावांचा समावेश आहे. मात्र मागील महिन्याभरापासून बारदान्याचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना गरजेपोटी बाहेरुन बारदाना खरेदी करुन धान विक्रीस न्यावा लागत आहे.
त्यामुळे याचा अतिरिक्त भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. तर बारदान्याअभावी बाराभाटी, येरंडी, कुंभीटोला, बोळदे, कवठा, सुकडी, खैरी, ब्राम्हणटोला, दाभना, डोंगरगाव, चापटी,अरततोंडी परिसरातील शेतकऱ्यांची भटकंती सुरू आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून बारदाना उपलब्ध करुन देण्याची मागणी आहे.
अनेक दिवसांपासून या संस्थेत बारदाणा उपलब्ध नाही. या संस्थेच्या पदाधिकाºयांनी बारदाना उपलब्ध करुन द्यावा. बारदाण्याअभावी धान विक्री करण्यास अडचण निर्माण होत आहे.
-दिलवर रामटेके, शेतकरी येरंडी
....................................................
महामंडळाकडून बारदाणा मिळाला नाही. पर्यायी व्यवस्था किंवा धान केंद्रावर खरेदी कराता यावी, यासाठी आम्ही शेतकºयांचा ७१०० बारदाणा पंधरा रुपये दराने उपलब्ध करुन दिला आहे.
-एल.बी. बागडे,
सचिव, आदिवासी विविध सेवा सहकारी संस्था,बाराभाटी.
....................................................
आम्ही दोन महिन्यांपासून बारदाणा टेंडरसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. टेंडर पास झाले परंतु कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराकडून अद्यापही बारदाण्याचा पुरवठा करण्यात आला नाही.
- राहुल पाटील, व्यवस्थापक
आदिवासी महामंडळ कार्यालय, प्रादेशिक सह उपायुक्त नवेगावबांध .