शिकार झालेला ‘तो’ वाघ नवेगावातील?

By admin | Published: October 19, 2016 02:47 AM2016-10-19T02:47:37+5:302016-10-19T02:47:37+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाघाच्या कातडीची तस्करी उघडकीस आणून कातडीसह तीन आरोपींना पकडल्यानंतर

Hunted 'he' in Tiger? | शिकार झालेला ‘तो’ वाघ नवेगावातील?

शिकार झालेला ‘तो’ वाघ नवेगावातील?

Next

वाघीण व दोन बछडे गायब : वनविभागाची गोपनियता देतेय संशयाला वाव
गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाघाच्या कातडीची तस्करी उघडकीस आणून कातडीसह तीन आरोपींना पकडल्यानंतर आता या प्रकरणातील आरोपींची संख्या ११ वर पोहोचली आहे. मात्र या प्रकरणाचे गूढ उकलण्यास वनविभाग अजून तयार नाही. दबक्या आवाजातील चर्चेनुसार नवेगावबांधच्या वनक्षेत्रातून गायब असलेल्या वाघिणीची शिकार झाली असून तिचीच ती कातडी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरातील एक मादा व तिचे दोन बछडे दोन वर्षापासून बेपत्ता आहेत. दोन वर्षापूर्वी अर्जुनी-मोरगाव ते गडचिरोली या दक्षिण परिसरात सदर वाघिण दोन बछड्यांसह फिरत होती. या वाघिणीला बछड्यांसह अनेकांनी पाहिले. परंतु ती वाघिण अचानक बेपत्ता झाली. चिचगड-कोरची परिसरात या वाघांचा सहवास होता. त्यादरम्यान वाघिणीसह दोन्ही बछड्यांची शिकार तर झाली नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून यासंदर्भात वनविभागाला कोणती माहिती मिळाली हे अद्याप बाहेर आलेले नाही. परंतु वनविभाग तपासाच्या नावावर कमालीची गुप्तता पाळत आहे.
वनविभागाने या प्रकरणात ११ आरोपीन्ाां अटक केली असून त्यांना २० पर्यंत वनकोठडी मिळविली आहे. वाघाची शिकार ज्याने केली त्याचे नावही वनविभागाला माहित झाले परंतु शिकार कोणत्या ठिकाणी व कुठल्या वाघाची झाली ही माहिती वनविभाग सध्यातरी उघड करायला तयार नाही. नवेगाव राष्ट्रीय उद्यान परिसरात दोन वर्षापूर्वी वावरणारी वाघिण बछड्यांसह बेपत्ता झाली. तिची नोंद वनविभागाकडे नसली तरी वनविभाग हे प्रकरण आपल्या अंगावर शेकू नये यासाठी गुप्तता पाळत असल्याचे बोलले जाते.
या प्रकरणात भावेश करमकर (२५) रा.चारगाव, सुरेंद्र शहारे रा.कन्हाळगाव, राजकुमार उर्फ पप्पू मेश्राम (२५) रा.परसटोला यांना आधीच अटक झाली होती. तीन आरोपी फरार होण्यात यशस्वी ठरले होते. वन विभागाच्या तपासादरम्यान हेमंत भरत अरकरा (४८) रा.गडेगाव, सुरेश केवलराम राऊत (२९) रा.शिरपूर, विलास हरिदास बडोले (३४) रा.अंभोरा, महेंद्र विलास धमगाये (४२) रा.खामखुर्रा, रामदास संमाराम मडावी (२९) रा.गुडरी व शिवराम सुंदर तुलावी (२६) यांना अटक झाली. त्यानंतर आणखी दोन जणांना ताब्यात घेतल्याने आरोपींची संख्या ११ वर गेली आहे.
परंतु पुढे जे आरोपी अटक करण्यात येत आहे त्या आरोपीची माहिती प्रसार माध्यमांंना देण्यास वनविभाग का टाळत करीत आहे, हे न समजणारे कोडे आहे. (तालुका प्रतिनिधी)

गोपनियता का?
वन्यप्राण्यांचा संरक्षणासाठी वन्यजीव प्रेमी रात्रंदिवस एक करून धडपड करतात. परंतु त्यांना ही या प्रकरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वनाधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा समाजापुढे येऊ नये यासाठीच ही धडपड नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
‘त्या’ शिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
सदर वाघाची शिकार करणारा शिकारी गडचिरोलीच्या खोबरामेंढा येथील असून त्याचे नाव दलपत असल्याचे उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले. परंतु शिकार करणाऱ्या त्या आरोपीचा अपघातात मृत्यु झाला, असे वनविभागाच्या सूत्रांकडून समजते. शिकार करणाऱ्याचे नाव वनविभाग देते, परंतु अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव वनविभाग लपवून ठेवत आहे. शिकाऱ्यांच्या सोबत असलेले इतर आरोपी फरार होऊ नये म्हणून नाव गुपीत ठेवत असल्याचे रामगावकर म्हणाले.

Web Title: Hunted 'he' in Tiger?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.