फासे लावणाऱ्या शिकाऱ्याला पकडले
By admin | Published: January 9, 2016 02:08 AM2016-01-09T02:08:35+5:302016-01-09T02:08:35+5:30
नवेगावबांध राष्ट्रीय अभयारण्यात फासे लावून लहान वन्यप्राण्यांची शिकार करताना मुद्देमालासह एका आरोपीला रंगेहात पकडण्यात वन्यजीव विभागाला यश आले.
सडक अर्जुनी : नवेगावबांध राष्ट्रीय अभयारण्यात फासे लावून लहान वन्यप्राण्यांची शिकार करताना मुद्देमालासह एका आरोपीला रंगेहात पकडण्यात वन्यजीव विभागाला यश आले.
गुरूवारी सायंकाळी ४.१५ वाजता राष्ट्रीय अभयारण्यातील कोसबी सहवनक्षेत्रात येणाऱ्या निशानी बिटातील कम्पार्टमेंट नंबर ६९९ मध्ये खडकी बाम्हणी येथील दोन इसमांना फासे लावताना दिसले. त्यात जीपलाल मसराम (३५) याचा पाठलाग करुन पकडण्यात आले. पण त्याचा सहकारी फुलचंद मडावी हा पसार झाला.
जीपलालला न्यायालयात हजर केल्यानंतर जामीन देण्यात आला. ही कारवाई तपास उपविभागीय वनअधिकारी एस.के. गुप्ता, वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश दोनोडे यांचे मार्गदर्शनात कोसबीचे क्षेत्र सहायक शैलेंद्र भदाने, वनरक्षक दुलीचंद सूर्यवंशी यांनी केली.
वनरक्षक व क्षेत्र सहाय्यक राष्ट्रीय अभयारण्यात गस्तीवर असताना या वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या आरोपींना पकडण्यात यश आले. यापूर्वी रानडुकरांची शिकार करताना रात्रीचे वेळी काही आरोपींना पकडण्यात यश आले होते. वन्य कर्मचारी व अधिकारी सतर्क असल्यामुळे या अभयारण्यात चोरांना पकडण्यात यशस्वी होताना दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)