बिबट्याने केली ६ बकऱ्यांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 09:42 PM2019-08-04T21:42:37+5:302019-08-04T21:42:51+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या केळवद (तुकुमनारायण) येथील केवलराम वालदे यांच्या घरी गोठ्यात बांधलेल्या पाच बकऱ्या व एक बोकडाची शिकार बिबट्याने केली. ३ते४ आॅगस्टच्या रात्री ही घटना घडली. केवलराम वालदे यांचे ६० हजाराचे नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या केळवद (तुकुमनारायण) येथील केवलराम वालदे यांच्या घरी गोठ्यात बांधलेल्या पाच बकऱ्या व एक बोकडाची शिकार बिबट्याने केली. ३ते४ आॅगस्टच्या रात्री ही घटना घडली. केवलराम वालदे यांचे ६० हजाराचे नुकसान झाले. वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आली आहे.या घटनेचे गांभीर्य पाहून वनक्षेत्राधिकारी मेंढे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक पाटील, लांजेवार, चौकीदार मेंढे, जांभूळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मागील काही दिवसांपासून या गावात बिबट्याने हैदोस घातला आहे. काही दिवसांपूर्वी शासकीय आश्रमशाळा इळदाच्या सुरक्षा भिंतीवर बिबट्या बसला होता. त्यामुळे गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याच्या बंदोबस्त लावण्याची मागणी केली आहे.