जबरीने युरिया पाजून केली पतीची हत्या
By admin | Published: December 10, 2015 02:00 AM2015-12-10T02:00:51+5:302015-12-10T02:00:51+5:30
देवरी येथील सुरेश एकनाथ लोणकर (३०) या इसमाला त्याची पत्नी, साळा व सासरा यांनी बळजबरीने युरीया पाजून त्याचा खून केला.
११ महिन्यानंतर उघड : आरोपीत साळा व सासऱ्याचा समावेश
गोंदिया : देवरी येथील सुरेश एकनाथ लोणकर (३०) या इसमाला त्याची पत्नी, साळा व सासरा यांनी बळजबरीने युरीया पाजून त्याचा खून केला. या संदर्भात पोलिसांनी तक्रार न घेतल्याकडे मृताच्या आईने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून देवरी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींविरूध्द तब्बल ११ महिन्यानंतरप गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ३ जानेवारी ते ६ जानेवारी २०१५ या काळात देवरीच्या सुरेश एकनाथ लोणकर या तरूणाला त्याची पत्नी पल्लवी सुरेश लोणकर, सासरा कब्बल सिताराम क्षीरसागर व साळा मोनी उर्फ मोहनिस कब्बल क्षीरसागर यांनी बळजबरीने युरीया पाजून त्यांचा खून केला. पण त्यावेळी याप्रकरणी केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
या संदर्भात सुरेशची आई कौशल्या एकनाथ लोणकर यांनी न्यायालयाकडे धाव घेतली. देवरी न्यायालयाच्या आदेशावरून देवरी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीविरूध्द ८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.