हुश्श.. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५.२२ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:31 AM2021-05-20T04:31:08+5:302021-05-20T04:31:08+5:30

गोंदिया९ : मे महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. त्यामुळे सुरुवातीला ३३ टक्क्यांवर असलेला रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट ...

Hushh .. District's positivity rate at 5.22 percent | हुश्श.. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५.२२ टक्क्यांवर

हुश्श.. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५.२२ टक्क्यांवर

Next

गोंदिया९ : मे महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. त्यामुळे सुरुवातीला ३३ टक्क्यांवर असलेला रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आता ५.२२ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे समाधानकारक चित्र आहे; पण अजूनही धोका पूर्णपणे टळलेला नसून नागरिकांनी पूृर्वीइतकीच काळजी घेत कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात बुधवारी (दि.१९) ६२५ बाधितांनी कोरोनावर मात केली तर १४४ नवीन रुग्णांची नोंद झाली. ६ रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी व शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. नवीन रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. एकंदरीत मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून दुसरी लाट ओसरल्याचे समाधानकारक चित्र आहे. मात्र, यानंतरही जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. तरच कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यास मदत होईल. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १४७८४६ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १२२२८६ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन चाचणी केली जात आहे. याअंतर्गत १४८१९८ जणांचे नमुने तपासण्यात आले. यापैकी १२७५४८ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९७९५ कोराेनाबाधित आढळले. यापैकी ३६८७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत २२६८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १३१९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

...........

२४४१ चाचण्यांमध्ये १४४ पॉझिटिव्ह

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने २४४१ जणांच्या आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १४४ जण पॉझिटिव्ह आले. म्हणजे शंभर रुग्णांची तपासणी केल्यानंतर १७ रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. मात्र, हे प्रमाण पुन्हा कमी होण्याची गरज आहे.

....

मृत्यूदर मात्र कायम

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाण आटोक्यात येत आहे. पॉझिटिव्हिटी रेटही ५.२२ टक्क्यांवर आला आहे. मात्र, बाधितांच्या मृत्यूचे सत्र कायम असल्याने मृत्यूदर १.६२ टक्क्यांवर पोहचला आहे. तर कोरोनाचा रिकव्हरी दर ९२.६६ टक्क्यांवर पोहचला असून तो राज्याच्या तुलनेत सरस आहे.

.........

२ लाख १३ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह लसीकरणावरसुद्धा भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख १३ हजार ५२० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्याला १९ हजार लसीचे डोस प्राप्त झाल्याने लसीकरण मोहिमेलाही वेग आला आहे.

Web Title: Hushh .. District's positivity rate at 5.22 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.