मी लस घेतली तुम्ही पण घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:30 AM2021-02-24T04:30:51+5:302021-02-24T04:30:51+5:30
गोंदिया : कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे आपण सर्व हताश झालेले आहोत. अशात शासनाने अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर कोरोना व्हायरस आजारापासून ...
गोंदिया : कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे आपण सर्व हताश झालेले आहोत. अशात शासनाने अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर कोरोना व्हायरस आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण सुरू केले आहे. नियमांचे पालन करून सर्वांनी पुढाकार घ्यायचा आहे. समाजामध्ये अनेक प्रकारच्या अफवा पसरविल्या आहेत. त्यांना न घाबरता आपण सर्व मिळून सहकार्याने कोविड १९ प्रतिबंधक लस घेऊन शासनाला मदत करू या आणि स्वतःला, कुटुंबाला व देशाला सुरक्षित ठेवू या.
पहिली लस लावल्यानंतर २८ दिवसांनी दुसरी लस लावणे आवश्यक आहे. या लसीमुळे मला काहीही त्रास जाणवत नाही. काहींना किरकोळ त्रास होऊ शकतो असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे. एक मात्र विसरून चालणार नाही. आज लस घेतली म्हणजे आपण शंभर टक्के सुरक्षित झालो असं समजून सार्वजनिक ठिकाणी मास्क शिवाय वावरणे इत्यादी चुका करू नका. आधीप्रमाणेच मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्स पाळा, गर्दीचे ठिकाणी न जाणे, शिंकतांना काळजी घ्या व सर्व नियमांचे पालन करा. चला तर आपण सर्व कोविड १९ प्रतिबंधक लस घेऊन शासनाला आपला देश सुरक्षित करण्यासाठी सहकार्य करू या. मी लस घेतली आहे तुम्ही पण लस नक्कीच घ्या आणि कोरोना विरुद्धच्या लढ्यात सामील व्हा.